शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

फळ पिकवताना केमिकलचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:16 IST

अनैसर्गिक पद्धतीने फळांवर केमिकलचा वापर करून पिकविलेल्या फळांची चंद्रपुरात सर्रास विक्री केली जात आहेत, अशा फळांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. ही फळे सेवन करू नये, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे.

ठळक मुद्देआरोग्य धोक्यात : अशी फळे खाणे टाळावे, आहार तज्ज्ञांचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: अनैसर्गिक पद्धतीने फळांवर केमिकलचा वापर करून पिकविलेल्या फळांची चंद्रपुरात सर्रास विक्री केली जात आहेत, अशा फळांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. ही फळे सेवन करू नये, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे.सध्या आंब्याच्या हंगामाला सुरूवात झाली. शहरापासून खेडेगावापर्यंत फळविक्रेते गाड्यांवर फळांचा राजा आंबा, चिकु, सफरचंद, केळी, डाळिंब, कलींगड, खरबूज, टरबूज विक्री होत आहे. परंतु बाजारातील ही फळे खरोखर नैसर्गिकरित्या पिकवलेली आहेत का, याचा विचार कुणीही करत नाही, किंबहुना ही आपली जबाबदारी नाही, असे म्हणून अनैसर्गिकरित्या पिकवलेली फळे खरेदी करीत आहेत. तर दुसरीकडे अनैसर्गिक पिकविलेली फळे घेण्याव्यतिरिक्त बाजारात दुसरा पर्याय उपलब्ध नाही. अशी फळे सेवन केल्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण दिल्या जाते. आरोग्यावर दीर्घकालीन दुष्परिणाम होण्याचा धोका जास्त असल्याचे आरोग्य विभाग व आहार तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. काही वर्षांपूर्वी राजापुरी, लंगडा, हापूस, केशर, पायरी अशा विविध जातींचे आंबे चंद्रपूरच्या बाजारामध्य अल्प दरात मिळत होते.आता परिस्थिती बदलली आहे. वेगवेगळ्या जातीचे हे आंबे रत्नागिरी, कोकण, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थानमधून आण्यात आले, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मात्र हे आंबे नैसर्गिकरित्या पिकवलेली नाहीत. विविध रसायनांचा वापर करून पिकविल्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.आंबे, चिकू, केळी ही कार्बाईड विषारी पावडर वापरून किंवा लिक्विडचा वापर करून मोठे व्यापारी गोडाऊनमध्ये सर्रास पिकवितात. त्यानंतर ती फळे बाजारात विक्री जातात. सफरचंदावरसुद्धा वरून व्हॅसलीन किंवा मेनाचा मुलामा लावल्या जातो, अशी माहिती पुढे आली आहे.द्राक्ष बागावर मोठ्या प्रमाणात विषारी कीटकनाशकाच्या फवरण्या करतात. तर कलींगडावर घातक रासायन इंजेक्शनद्वारे सोडल्या जाते. केळीसुद्धा आरोग्याला घातक असणाºया लिक्विडमध्ये टाकली जातात. त्यानंतर पाण्यातून काढून पिकविण्यात येते. अनैसर्गिकरित्या पिकवलेल्या फळांच्या सेवनामुळे आरोग्य धोक्यात येण्याचे प्रमाण वाढले आहे. अशी फळे सेवन न करणे हाच उपाय असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.गावरान आंबे गायबकाही वर्षांपूर्वी थेट शेतकऱ्यांच्या आमराईतील आंबे तोडून आणल्या जात होती. परंतु सध्या गावरान आंब्याचे प्रमाण कमी झाले आहे. यंदा अल्प पाऊस पडल्याने शेत व आमराईतील आंब्याची झाडे वाळली. गावरान आंबा फक्त नावापुरातच उरला आहे

टॅग्स :fruitsफळे