शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

हाॅटेलात नेऊन दोन नऊ वर्षीय मुलांसोबत केले अनैसर्गिक कृत्य; आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2022 21:02 IST

Chandrapur News एका विकृत इसमाने खेळत असलेल्या दोन नऊ वर्षीय मुलांना चाॅकलेटचे आमिष दाखवून, शहरातीलच एका हाॅटेलात नेऊन त्यांच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

ठळक मुद्देसिंदेवाहीतील लांछनास्पद घटना

चंद्रपूर : एका विकृत इसमाने खेळत असलेल्या दोन नऊ वर्षीय मुलांना चाॅकलेटचे आमिष दाखवून, शहरातीलच एका हाॅटेलात नेऊन त्यांच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी पोलिसात धाव घेऊन एकच गर्दी केली होती. या प्रकरणी श्रीधर मेंदू डकर (३७) रा.नागपूर याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमांतर्गत कलम ३६३, ३७७ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

महात्मा फुले वार्डातील चौकात दोन नऊ वर्षांची मुले त्यांचे आई-वडील आठवडी बाजारात गेल्याने खेळत होती. श्रीधर मेंदू डकर हा पूर्वी सिंदेवाहीतच राहात असल्याने तो परिचयाचा होता. तो काही नागरिकांसोबत बोलत होता. नागरिक तेथून निघून जाताच, तो खेळत असणाऱ्या दोन मुलांकडे गेला. त्यांना चॉकलेट व नवीन सँडल घेण्याचे आमिष दाखवून सिंदेवाहीतीलच मनमंदिर नावाच्या हॉटेलात घेऊन गेला. ही मुले आपल्या बहिणीची असल्याचे कारण त्याने हॉटेल मालकाला सांगितले. गाडी घ्यायची असल्याच्या नावावर हॉटेलमध्ये एका तासाकरिता खोली घेतली. खोलीत जाऊन त्याने त्या दोन्ही मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य केले. त्यातील एक मुलगा पळून जाण्यात यशस्वी ठरला. त्याने हॉटेलच्या मालकाला संपूर्ण हकिकत सांगितल्यानंतर, काही नागरिकांच्या माध्यमातून पोलिसांना फोन करण्यात आला. पोलिसांनी हाॅटेलात धाव घेऊन श्रीधर डकर याला ताब्यात घेतले. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

त्याच्या सतर्कतेने घटना उघड

दोन मुलांपैकी एक मुलगा हाॅटेलाच्या खोलीतून बाहेर जाण्यास यशस्वी झाला. यानंतर, त्याने घडलेला प्रकार हाॅटेल मालकाला सांगितला. हाॅटेल मालकांनी सतर्कतेने त्याला खोलीत बंद केले. यानंतर, काही लोकांना सोबत घेऊन पोलिसांना घटनेची माहिती दिली.

टॅग्स :Molestationविनयभंग