शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

मानवरहित रेल्वे क्रॉसिंग धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 12:29 AM

दळणवळणाची अनेक साधने आहेत. असे असले तरी प्रवास करण्यासाठी रेल्वेला प्रथम प्राधान्य देण्यात येते.

ठळक मुद्देअनेक ठिकाणी कर्मचारीच नाही : प्रभावी उपाययोजना करण्याची गरज

रवी जवळे ।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : दळणवळणाची अनेक साधने आहेत. असे असले तरी प्रवास करण्यासाठी रेल्वेला प्रथम प्राधान्य देण्यात येते. मात्र रेल्वे फाटक बंद असतानाही वाहनधारकांची बंद फाटकातून धोकादायक वाहतूक सुरू आहे. चंद्रपुरातील बाबुपेठ रेल्वे फाटक असो की जिल्ह्यातील इतर फाटक, केवळ दुर्लक्षामुळेच यात अनेकांचे बळी गेले आहेत. यावर प्रभावी उपाययोना करण्याची गरज आहे.चंद्रपूर जिल्ह्यात पोंभूर्णा, गोंडपिपरी, जिवती व सावली तालुका सोडला तर सर्वच ठिकाणी रेल्वेचे जाळे पसरले आहे. अनेक ठिकाणी रेल्वे फाटक लावले आहेत. तर काही रेल्वे क्रॉसिंग मानवरहित आहेत. चंद्रपुरात बाबुपेठ रेल्वे फाटक अलिकडे असेच धोकादायक झाले आहे. एकाच ठिकाणी एक्स्प्रेस व बीएनआर रेल्वे लाईनचे दोन फाटक आहेत. दिवसातून अनेकदा हे फाटक बंद राहत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. या त्रासातूनच अनेक वाहनधारक फाटक बंद असतानाही लोखंडी रॉडखालून आपली दुचाकी वाहने काढून पुढे जातात. एका वाहनधारकाने हा प्रकार केला की लगेच दुसरा करतो, मग तिसरा, चौथा, अगदी भरधाव रेल्वे जवळ येईपर्यंत हा प्रकार सुरूच असतो. या धोकादायक प्रकार बाबुपेठमध्ये अनेकदा अंगलट आला आहे. तरीही हा प्रकार थांबलेला नाही.वरोरा तालुक्यात चैन्नई- नवीदिल्ली रेल्वे मार्ग जातो. ही रेल्वे लाईन रेल्वे गाड्यांच्या अवागमनाने नेहमी व्यस्त असते. या रेल्वे लाईनवर मोहबाळा, डोंगरगाव (रे.), नागरी या गावाजवळ रेल्वे गेट आहे. गेट बंद असताना येथून नागरिक जाणेयेणे करतात. मूल, सिंदेवाही, राजोली, मारडा, कोंढा, ताडाळी, राजुरा, नागभीड, भद्रावती या तालुक्यातही बंद रेल्वे फाटकातून वाहनांची वाहतूक सुरू राहते.उंच असलेले ट्रक व क्षमतेपेक्षा अधिक भार वाहणारे ट्रक रेल्वे लाईनमध्ये अडून धोका होण्याची शक्यता मोहबाळा रेल्वे गेटवर अधिक आहे. या गेटमधून औद्योगिक वसाहतीमधील उद्योगात ट्रक जात असतात.नागभीड तालुक्यातील अनेक रेल्वे क्रॉसिंगवर भूमिगत बोगदे तयार केले आहेत. त्यामुळे रेल्वे रुळावरून नागरिकांचे जाणेयेणे कमी झाले आहे. भद्रावती, वरोरा व चंद्रपूर तालुक्यातही अनेक ठिकाणी मानवरहित रेल्वे क्रासींग आहेत.भद्रावती तालुक्यात तेलवासा, चारगाव, कुनाडा येथे रेल्वे फाटक आहे. फाटक बंद असतानाही पायदळ नागरिक तिथून जातात. एनटीपीसीसमोरही रेल्वे फाटक आहे. विशेष म्हणजे, या मार्गावरून आयुधनिर्माणीतील स्फोटके भरून वाहने जातात. मात्र या ठिकाणी कोणतीही चौकी नाही वा कोणताही कर्मचारी राहत नाही.उपस्थित कर्मचाऱ्यांना देणेघेणे नाहीचंद्रपुरातील बाबुपेठ फाटक असो की जिल्ह्यातील कुठलाही रेल्वे फाटक असो. तिथे २४ तास कर्मचारी तैनात असणे आवश्यक आहे. मात्र या कर्मचाºयाच्या डोळ्यादेखत बंद फाटकातून वाहनधारक धोकादायक क्रासींग करतात. मात्र कर्मचाºयांकडून त्यांना साधे हटकलेही जात नाही. जणू त्यांना त्याचे काही देणेघेणेच नसावे.दरवाजाचे फाटक होऊ शकतो उपायसाधारणत: लोखंडी रॉड खाली पाडून फाटक बंद केले जाते. त्यामुळे या रॉडखालून वाहनधारक आपल्या गाड्या काढण्याचे अनाठायी धाडस करतात. याऐवजी अशा रेल्वे क्रासींगवर दोन दरवाजाचे गेट बसविले तर तिथून वाहन काढणे वाहनधारकांना शक्य होणार नाही .