शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

सोमवारपासून अनलॉक ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 05:00 IST

कोरोना संसर्गाचा दर उच्च बिंदूवर होता. मृतांची संख्याही धडकी भरविणारी होती. या निर्बंधामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची नाकाबंदी झाली. शेतमाल पुरवठ्याची साखळी तुटून शेतकऱ्यांना फटका असला. कोरोना संसगार्पासून दूर राहण्याची खबरदारी तर दुसरीकडे पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी करावा लागणारा आटापीटा या संघर्षात हजारो नागरिकांची दमछाक झाली. आता पॉझिटिव्हिटी रेट घसरला असून जिल्ह्यात अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात आला आहे.

ठळक मुद्देपॉझिटिव्हिटी दर घसरला : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती आज निर्णय घेणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आलेख कमालीचा घसरला. शिवाय ऑक्सिजन बेड्सवर निर्भर असणाऱ्या रूग्णांची संख्येतही माेठी घट घटली. राज्य सरकारच्या निकषात पात्र ठरले. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात आला. राज्य शासनाने स्थानिक निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला  दिले. रविवारी या संदर्भात बैठक होणार असून निर्बंध शिथिल केल्यानंतर काय  बंद आणि काय सुरू याची माहिती जाहिर होऊ शकते. त्यामुळे नागरिकांचे लक्ष संभाव्य अनलॉकडे लागले आहे.  कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार ब्रेक द चेन अंतर्गत ३१ मार्च २०२१ पासून ३० एप्रिल २०२१ पर्यंत निर्बंध लागू केले. या कालावधीत कोरोना संसर्गाचा दर उच्च बिंदूवर होता. मृतांची संख्याही धडकी भरविणारी होती. या निर्बंधामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची नाकाबंदी झाली. शेतमाल पुरवठ्याची साखळी तुटून शेतकऱ्यांना फटका असला. कोरोना संसगार्पासून दूर राहण्याची खबरदारी तर दुसरीकडे पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी करावा लागणारा आटापीटा या संघर्षात हजारो नागरिकांची दमछाक झाली. आता पॉझिटिव्हिटी रेट घसरला असून जिल्ह्यात अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात आला आहे.

पॉझिटिव्हिटी दर ५ टक्क्यांपेक्षा कमी असेल आणि ऑक्सिजन बेड्स २५ टक्क्यांपेक्षा कमी तर तो भाग पहिल्या स्तरात येईल.

पॉझिटिव्हिटी दर ५ टक्क्यांपेक्षा कमी असेल आणि ऑक्सिजन बेड्स २५ ते ४० टक्क्यांपर्यंत भरलेला भाग दुसऱ्या स्तरात येईल.पॉझिटिव्हिटी दर ५ ते १० टक्क्यांपेक्षा दरम्यान असेल आणि ऑक्सिजन बेड्स ४० टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले असल्यास तिसऱ्या स्तरात येईल.पॉझिटिव्हिटी दर १०-२० टक्क्यांच्या दरम्यान असेल आणि ऑक्सिजन बेड्स ६० टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले असल्यास चौथ्या स्तरात येईल.पॉझिटिव्हिटी दर २० टक्क्यांपेक्षा जास्त असतील आणि ऑक्सिजन बेड्स ७५ टक्क्यांपेक्षा जास्त भरले असल्यास पाचव्या स्तरात येईल.

चंद्रपूर जिल्हा ‘अनलॉक’ च्या पहिल्या टप्प्यातराज्य शासनाने सोमवारपासून अनलॉक करण्यासाठी पाच स्तरांमध्ये जिल्ह्यांची विभागणी करून स्तरनिहाय नियम जाहीर केले. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ५ टक्क्यांपेक्षा (२. ९९ टक्के ) कमी आहे. शिवाय ऑक्सिजन बेड्सही २५ टक्क्यांपेक्षा (१५ टक्के) कमी आहे. त्यामुळे अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात जिल्हा आला. पण अनलॉकचा निर्णय जिल्हा टॉक्सफोर्स ठरविणार आहे.

काय बंद राहू शकते ?सलून, स्पा, ब्युटी पॉर्लर, जिम, शाळा, कॉलेज, उद्याने, स्विमिंग पूल, सिनेमा हॉल, नाट्यगृह, कोचिंग क्लासेस. आवश्यक अनुज्ञेय बाबींशिवाय दुपारी ३ वाजतानंतर रस्त्यावर फिरण्यास बंदी राहू शकते. राज्य शासनाने शुक्रवारी काही जिल्ह्यांसाठी हि सवलत लागू केली होती. चंद्रपूर जिल्ह्यात अनलॉकचा निर्णय रविवारी घेतला जाऊ शकतो. 

काय सुरू राहील?अत्यावश्यक सेवा व बिगर अत्यावश्यक (वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत सेवा वगळून) सेवांची सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत सुरू राहील. याव्यतिरिक्त इतर सेवा, वस्तु ई-कामर्सद्वारे सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत वितरण, बँक, पोस्ट, बांधकाम, वाहतूक, उद्योग, कारखाने, किराणा, बेकरी, दूध, चिकन, मटन, अंडी, पशुखाद्य, ऑप्टीकल, निवासी हॉटेल, लॉज (५० टक्के) हॉटेल, रेस्टारंट खानावळ घरपोच सेवा, एकल दुकाने (शॉपिंग सेंटर व मॉलमधील दुकाने वगळून) शनिवार व रविवाद बंद, विवाह २५ लोकांच्या मर्यादेत सुरू राहू शकतात. त्यामुळे जिल्हा समितीच्या निर्णयाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील कोविड संदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक रविवारी आयोजित केली आहे. या बैठकीत सर्वंकष आढावा घेतल्यानंतर  निर्णय जाहिर करण्यात येणार आहे. त्यामुळे आधीचे सर्व निर्बंध सध्या तरी जैसे थे आहेत.-  अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी चंद्रपूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार