शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञातांनी रेल्वेमार्गावर ठेवले सिमेंट स्लीपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2021 05:00 IST

वरोरा शहरानजीक चिकणी गावाजवळून नवी दिल्ली चेन्नई रेल्वेमार्गावर लोखंडी प्लेट ठेवण्यात आली होती. दरम्यान, रेल्वेगाडी आली. हादऱ्यामुळे लोखंडी प्लेट खाली पडली. याबाबतची सूचना रेल्वे गाडीच्या पायलटने रेल्वे स्टेशन वरोरा येथे दिली. त्यामुळे रेल्वे प्रशासनात खळबळ माजली. त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. पोलीस व रेल्वे अधिकाऱ्यांनी चिकणी गावाजवळ जाऊन नवी दिल्ली चेन्नई रेल्वेमार्गाची पाहणी केली असता, रेल्वेमार्गावर सिमेंटचे स्लीपर आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : नवी दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्गावर वरोरा शहराच्या जवळील चिकणी गावानजीक अज्ञातांनी सिमेंट स्लीपर ठेवला होता. ही बाब वेळीच रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आल्याने पोलिसांच्या उपस्थितीत सिमेंट स्लीपर हटविण्यात आले. या दरम्यान एकही रेल्वे या रुळावरून गेली नसल्याने मोठा अनर्थ टळला.  वरोरा शहरानजीक चिकणी गावाजवळून नवी दिल्ली चेन्नई रेल्वेमार्गावर लोखंडी प्लेट ठेवण्यात आली होती. दरम्यान, रेल्वेगाडी आली. हादऱ्यामुळे लोखंडी प्लेट खाली पडली. याबाबतची सूचना रेल्वे गाडीच्या पायलटने रेल्वे स्टेशन वरोरा येथे दिली. त्यामुळे रेल्वे प्रशासनात खळबळ माजली. त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. पोलीस व रेल्वे अधिकाऱ्यांनी चिकणी गावाजवळ जाऊन नवी दिल्ली चेन्नई रेल्वेमार्गाची पाहणी केली असता, रेल्वेमार्गावर सिमेंटचे स्लीपर आढळून आले. ते सिमेंटचे स्लिपर तत्काळ हटविण्यात आले. या दरम्यान, एकही प्रवासी अथवा मालवाहतूक करणारी रेल्वे गेली नसल्याने मोठी दुर्घटना टळली असल्याचे मानले जात आहे. सिमेंट स्लीपरचे वजन बघता ते उचलण्याकरिता पाचपेक्षा अधिक व्यक्ती असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

त्याने दाढी काढली, स्वतः जाळ्यात आलाघटनेच्या परिसरात दाढीधारी इसम फिरत असल्याची माहिती समोर आली. त्या इसमाला आपल्यावर संशय आला असल्याची चिंता वाटली. आपण पकडले जाऊ, म्हणून त्याने रात्री गावातील न्हाव्याकडे जाऊन नीटनेटकी वाढवलेली दाढी काढून घेतली. त्यावरून त्याला संशयित म्हणून ताब्यात घेतल्याची चर्चा आहे. कधीही दाढी काढली नाही अन् दाढी काढताच तो जाळ्यात अडकल्याची खमंग चर्चा परिसरात केली जात आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वे