शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारीमुळे विद्यार्थी नैराश्यतेच्या खाईत

By admin | Updated: August 15, 2015 01:22 IST

दरवर्षी कितीतरी तरूण-तरुणी शिक्षण पूर्ण करून बाहेर पडत असताना त्यांच्या नोकरीचा प्रश्न बिकट होत आहे.

गुंजेवाही : दरवर्षी कितीतरी तरूण-तरुणी शिक्षण पूर्ण करून बाहेर पडत असताना त्यांच्या नोकरीचा प्रश्न बिकट होत आहे. नोकरीसाठी आलेले अपशय आणि एक बेरोजगाराच जीवन जगणाऱ्या या युवा पिढीला ही बेरोजगारी नैराश्येच्या खाईत लोटत असल्याचे चित्र आता जागोजागी पाहावयास मिळत आहे.कित्येक युवक-युवती आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगारासाठी मनात एक सुप्त इच्छा बाळगून असतात. शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्याला हवी तशी नोकरी मिळेल, अशी सर्वांना आशा असते. पण त्यावेळी चित्र हे उलटेच असते. कोणत्याही ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला आणि त्यानुसार ुमुलाखत दिली तर ‘कळवू’ असा शेरा त्यांना मिळतो आणि कधीच त्यांना कळविले जात नाही. नोकरीच्या शोधात असे कितीतरी वर्ष निघून जातात. पण नोकरी नसल्याने आणि पाहिजे तसा व्यवसाय नसल्याने आजच्या तरुणांना नशिबी नैराश्य येत आहे. आजुबाजुला नजर टाकली तर असे चित्र दिसून येईल की, ज्यांच्या जवळ पैसा किंवा ओळख अशानाच नोकरीची संधी मिळते. सरकारी कार्यालय असो की, शिक्षण संस्था त्या आर्थिक व्यवहारातच गुंतलेल्या दिसतात. बेरोजगार युवक मोठ्या आशेने शिक्षण घेतात. ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुत आहे, ते पैशाअभावी नोकरीपासून दूर आहेत. ही खेदाची बाब आहे. यातून आजच्या तरुण पिढीला एक नैराश्य येत आहे. याचा विपरित परिणाम होऊन काही तरुण वाईट मार्गाला लागत आहे. मिळेल त्या ठिकाणी अवैध धंदे करून आता पैसा मिळविण्याकडे त्यांचा कल आहे. परिस्थितीपुढे ते शरण होत आहे. त्यात त्यांचा काय दोष? आजच्या युवा पिढीवर उद्या या देशाचे भविष्य अवलंबून आहे. पण ही युवा पिढी अशी नैराश्येच्या गर्तेत खोल ढकलली जात असल्याने पुढे देशाचे काय होईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.यासाठी शासनाने बेरोजगार तरुणांसाठी काहीतरी ठोस योजना आखल्या पाहिजे. जेणेकरून युवकांनी घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग करून आपला रोजगार मिळवू शकतील. ग्रामीण आणि शहरातही बेरोजगार वाढले असून दारू, सट्टा यासारख्या वाईट व्यसनाच्या मार्गाला लागून स्वत:चे जीवन उद्धवस्त करीत आहेत. दरवर्षी विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडतात. पण त्यांना उपयुक्त रोजगार मिळत नाही. त्यांच्या हाताला हवा तसा रोजगार उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे. त्या दृष्टीने शासनाचे नियोजन हवे. (वार्ताहर)