शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
4
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
5
'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!
6
"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 
7
Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
8
IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...
9
५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
11
इराणच्या बाजुलाच आहे अमेरिकन लष्कराचा ताफा, कशासाठी झाला आहे वापर?
12
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
13
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
14
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
15
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
16
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
17
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
18
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
19
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
20
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  

५०० च्या नोटांवर अघोषित बंदी

By admin | Updated: June 21, 2015 01:44 IST

नकली नोट प्रकरणात चिमूर येथील व्यापाऱ्यासह एकूण सात आरोपी हिंगणघाट पोलिसांच्या ताब्यात असून कसून तपास सुरू आहे.

चिमूर : नकली नोट प्रकरणात चिमूर येथील व्यापाऱ्यासह एकूण सात आरोपी हिंगणघाट पोलिसांच्या ताब्यात असून कसून तपास सुरू आहे. आरोपीकडे पाचशे व हजार रुपयांच्या नकली नोटा सापडल्याने चिमूरमधील नागरिकांकडे असलेल्या खऱ्या पाचशे किंवा हजार रुपयांच्या नोटा चलनात आणताना अडचणी निर्माण झाल्या आहेत. या नोटांवर एक प्रकारची अघोषित बंदीच घालण्यात आल्याचे दिसून येत आहे. खरी नोट असतानासुद्धा काही व्यापारी घेत नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.चिमूरमधील हॉटेल व्यवसायी रमेश पटेल हे आपल्या सहकार्यासह हिंगणघाट येथे जावून नकली नोटा चलनात आणताना नागरिकांच्या सतर्कतेने पोलिसांनी पकडले होते. पोलिसांच्या दणक्याने व बाजीरावच्या धाकाने आरोपी बोलू लागले. त्यात चिमूरचा प्रतिष्ठित व्यापारी यांच्या नोकराच्या घरी असलेल्या अठरा हजारांच्या नोटा सापडल्या. यावरून पाचशे व हजारांच्या नोटाकडे दुकानदार संशयाच्या नजरेने पाहत आहेत. खरी नोट घेऊन गेल्यावरही व्यावसायिक परत पाठवित आहेत. बँकेतच नोटा चेक करण्यासाठी मशीन आहे. बऱ्याच दुकानात चेकमशीन नाही. त्यामुळे गोरगरीब जनतेकडे असलेली पाचशे किंवा हजार रुपयांची नोट चलनात आणण्यास अडचण निर्माण झाली आहे.पाचशे किंवा हजार रुपयाची नोट घेण्यास अघोषित बंदी झाल्याने नागरिकांत त्रस्त झाले आहेत. खरी नोटच घेण्यास टाळाटाळ होत असल्याने त्यांनी जायचे कुठे, हा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने याबाबत जनतेत जागृती करावी, जेणेकरून सामान्य जनतेच्या अडचणी दूर होतील. (शहर प्रतिनिधी)