शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
3
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
4
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
5
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
6
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
7
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
8
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
9
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
10
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
11
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
12
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
13
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
14
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
15
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
16
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
17
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
18
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
19
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
20
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क

चंद्रपुरातील अंतर्गत रस्त्यांची चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 21:39 IST

शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असल्याची बतावणी मनपातर्फे करण्यात येत आहे. मात्र शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्ते पूर्णपणे उखडले असून रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्त्याच्या दुरुस्ती केवळ मातीमिश्रीत साहित्यांचा वापर करुन करण्यात आली. मात्र पाच दिवस झालेल्या संततधार पावसाने पुन्हा रस्त्याची वाट लावली.

ठळक मुद्देदररोज किरकोळ अपघातएकाच मार्गावर दररोज मलमपट्टीमनपा व पालिकेचे नाममात्र लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असल्याची बतावणी मनपातर्फे करण्यात येत आहे. मात्र शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्ते पूर्णपणे उखडले असून रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्त्याच्या दुरुस्ती केवळ मातीमिश्रीत साहित्यांचा वापर करुन करण्यात आली. मात्र पाच दिवस झालेल्या संततधार पावसाने पुन्हा रस्त्याची वाट लावली.चंद्रपूर शहराची ऐतिहासिक शहर म्हणून ओळख आहे. शहराची वाढ झपाट्याने होत आहे. मागील महिन्यात झालेल्या पावसाने चंद्रपूर शहरातील कस्तुरबा मार्ग, महात्मा गांधी मार्ग, तुकूम मार्ग, चंद्रपूर-नागपूर मार्ग, रामनगर मार्ग, बाबुपेठ मार्ग, गांधी चौक ते बागला चौक मार्ग, गांधी चौक ते पठाणपुरा मार्ग, रहमत नगर मार्ग या प्रमुख मार्गासह दवाबाजार ते पाण्याची टाकी, अंचलेश्वर गेट ते लालपेठ, सवारी बंगल ते चोर खिडकी, वाहतूक कार्यालय याठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरुन वाहन चालविताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते.मागील महिन्यात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दोघांचा अपघातातमध्ये मृत्यू झाला होता. यावेळी मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची डागडूजी सुरु केली. मात्र डागडूजी करताना मातीमिश्रित साहित्याचा वापर करण्यात आला. त्यामुळे या मार्गावरुन वाहने गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूळ उडून वाहनचालकांना त्रास होत होता. मात्र मागील पाच दिवस चंद्रपुरात संततधार पाऊस पडला. त्यामुळे डागडूजी केलेल्या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडून मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांतील पाण्याचा अंदाज येत नसल्याने अनेक किरकोळ अपघात होत आहेत. मात्र अजूनही मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्याच्या पक्क्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली नाही.शिक्षिकेचा बळी घेतल्यानंतरही ते खड्डे जैसे थेशहरातील तुकूम रोेडवर असलेल्या वाहतूक कार्यालयासमोरील मार्ग पूर्णपणे उखडला असून रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. परिसरात बँक, हॉटेल, पोलीस मुख्यालय, कृषी कार्यालये आहेत. नागपूरकडे जाणाऱ्या ट्रॅॅव्हल्स याठिकाणी लागत असतात. तसेच या मार्गाने दुर्गापूरकडून येणारे ट्रकही मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. मात्र हा मार्ग पूर्णपणे उखडल्याने वाहन चालविताना अडचणीचा आहे. मागील महिन्यात या रस्त्यावर झालेल्या एका अपघातात शिक्षिकेचा मृत्यू झाला होता. दर नियमित लहान-सहान अपघात होत असून अनेकजण जखमी झाल्याच्या घटना घडत आहेत.अरुंद रस्तेही डोकेदुखीचचंद्रपूर नगरपालिकेचे महानगरपालिकेमध्ये रुपांतर झाले. मात्र शहरातील रस्त्याची स्थिती जैसे-थै आहे. शहरातील रस्ते पूर्वीच अरुंद आहेत. त्यातही अनेकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. पार्किंगची समस्या जैसे-थे आहे. त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होत होते. त्यातही रस्त्याची दैना परिणामी वाहनचालकांना वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे वाहतुकीच्या समस्या सोडविणे गरजेचे आहे.शहरातील खड्डे बुजवा - शहर काँग्रेसचे आयुक्तांना निवेदनचंद्रपूर शहरातील रस्ते पूर्णपणे उखडले असून रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. परिणामी अपघाच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीचे निवेदन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयुक्तांना देण्यात आले. यावेळी आयुक्तांनी पाणी गेल्यानंतर रस्त्याच्या दुरुस्तीच्या काम करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, माजी नगराध्यक्ष सुनीता लोढिया, ब्लॉक अध्यक्ष निखिल धनवलकर, राजू दास, दिपक कटकोजवार, सुरेश आत्राम, विशाल दास आदी उपस्थित होते. पाणी गेल्यानंतर रस्त्याची दुरुस्ती न केल्यास ठिय्या आंदोलन व होम हवन करण्याच्या इशारा त्यांनी दिला.मणक्याच्या व पाठीच्या आजारात वाढचंद्रपूर शहर हे संपूर्ण राज्यात प्रदूषीत शहर म्हणून अग्रस्थानी आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना विविध आजाराचा सामना करावा लागत आहे. मात्र आता शहरातील संपूर्ण रस्ते उखडले असून त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे नियमीत वाहन चालविणाºया वाहनचालकांना पाठीच्या व मणक्याच्या आजार घडत असून आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाप्रती रोष व्यक्त होत आहे.