शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

अनियमित वेतनाचा शिक्षकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:48 IST

जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे नियमित वेतन गत काही महिन्यांपासून उशिरा खात्यात जमा होत असल्यामुळे त्यांना अतिरिक्त व्याजाचा भुर्दंड बसत आहे. परिणामी शिक्षण विभागातील वेतन पथकाच्या कामाविषयी शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण असून दर महिन्यांच्या एक तारखेला वेतन जमा करावे, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. 

ठळक मुद्देनियमित वेतन द्या । जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक झाले संतप्त

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर :  जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे नियमित वेतन गत काही महिन्यांपासून उशिरा खात्यात जमा होत असल्यामुळे त्यांना अतिरिक्त व्याजाचा भुर्दंड बसत आहे. परिणामी शिक्षण विभागातील वेतन पथकाच्या कामाविषयी शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण असून दर महिन्यांच्या एक तारखेला वेतन जमा करावे, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. अनेक शिक्षकांनी घरांसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी अशा विविध कारणांसाठी कर्ज काढले आहेत. त्यामुळे शिक्षकांचे बँकेच्या कर्जाचे हप्ते, विम्याचे हप्ते, सोसायटीचे हप्ते उशिरा जमा होतात. त्यामुळे शिक्षकांना अतिरिक्त व्याजाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. सध्या सुरू असलेल्या लग्न सराईचा खर्च, याबरोबरच पहिल्या जून महिन्यात सुरू होणाऱ्या मुलांच्या प्रवेशासाठी शिक्षकांना उसनेवारी पैसे घ्यावे लागत आहेत. बरेचदा वेतन पथकाकडे शिक्षकांनी विचारणा केली असता वेतन पथक कोषागार कार्यालयाकडे  बोट दाखवते. याउलट कोषागार कार्यालय वेतन पथकाकडूनच बिले उशिरा येत असल्याचे सांगतात. पगारासोबतच इतरही अनेक समस्या भेडसावत असल्याने नियमीत वेतनाची मागणी आहे. शासनाच्या आदेशाचे उल्लंघनप्रत्येक महिन्याच्या एक तारखेला पगार देण्याचे शासनाचे आदेश आहे. अनेकदा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिन्याच्या एक तारखेला पगार खात्यावर जमा करण्याचे शिक्षक पदाधिकाºयांना आश्वासन दिले आहे. तरी देखील शिक्षण विभागाचे वेतन एक तारखेला मिळत नाही. त्यामुळे शिक्षकांना अनेक अडचणींला सामोर जावे लागते.