शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

ओपन स्पेसमध्ये सुरू आहे अनधिकृत टॉवरचे बांधकाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 16:04 IST

परवानगी नाकारली, तरी बांधकाम : मार्गक्रमणाचा रस्ता होणार अरुंद

दत्तात्रय दलाल लोकमत न्यूज नेटवर्क ब्रम्हपुरी : येथील जुन्या मदर पेठ शाळेच्या मागे ओपन स्पेस मध्ये अनधिकृत टॉवरचे बांधकाम करण्यात येत आहे. या टॉवरमध्ये रस्त्याचा बराच भाग येत असून भविष्यात येथील रहिवाशांना रहदारी करताना कमालीचा त्रास सहन करावा लागणार आहे. या टॉवरचे बांधकाम त्वरित बंद करून ओपन स्पेसवर अतिक्रमण करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

शिक्षणाचे माहेरघर, वैद्यकीय नगरी म्हणून ओळख असलेल्या ब्रम्हपुरी शहरात बाहेरून नोकरीकरिता आलेले चाकरमानी नेहमीसाठी स्थायिक होतात. शहरात मागील १५-२० वर्षांत अनेक भागात लेआऊटची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे शहराचा परीघ मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लेआऊटची निर्मिती करताना ओपनस्पेस सोडली जाते. अशा ओपन स्पेसचा ताबा नगरपरिषदेकडे असतो. येथील जुन्या मदर पेठ शाळेच्या मागे जुन्या लेआऊटची निर्मिती करण्यात आली होती. 

त्यावेळी अगदी रस्त्याच्या कडेला ओपन स्पेस सोडण्यात आली होती. सदर ओपन स्पेसवर अतिक्रमण करून अवैधरीत्या टॉवरचे बांधकाम करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी बांधकाम करण्यात येत आहे, त्याच्या मागील बाजूला अनेक घरे आहेत. जाण्यासाठी असलेला रस्ता टॉवरमध्ये जातो. त्यामुळे हा रस्ता अरुंद होणार आहे. आवागमन करताना नागरिकांना कमालीचा त्रास होणार आहे. ओपन स्पेसवर अतिक्रमण करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर नगरपरिषद कोणती कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

"टॉवर बांधकाम करण्यासाठी नगरपरिषदेला मंजुरीकरिता अर्ज करून मागणी करण्यात आली होती. नगरपरिषदेने मंजुरी नाकारली असून बांधकाम थांबविण्याचे कळविले आहे. तसे लेखी पत्र देऊन पोलिस विभागाला पाठविले आहे." -अर्थिया जुही, मुख्याधिकारी नगरपरिषद ब्रम्हपुरी

"नगरपरिषदेने केवळ लेखी पत्र दिले आहे. त्यामुळे कायद्याने ते बांधकाम थांबविता येत नाही. नगरपरिषदेने लेखी तक्रार दाखल केल्यास आम्हाला संबंधितावर उचित कारवाई करता येईल." -प्रमोद बानबले, ठाणेदार पोलिस ठाणे, ब्रम्हपुरी

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर