शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

दुचाकीच्या डिक्कीतून ३१ तोळे सोने उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 22:17 IST

चंद्रपूरच्या तुकुम परिसरात एका घरासमोर ठेवलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून तब्बल ३१ तोळे सोने उडविल्याची खळबळजनक घटना बुधवारी उघडकीस आली. या सोन्याची अंदाजे किमत १० लाख रुपये असल्याचे समजते. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलीस सुशिलकुमार यांनी स्वत: गटनेचा आढावा घेतला. या प्रकरणातील आरोपी अद्यापही गवसले नाही. तपास सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नायक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

ठळक मुद्देदूर्गापूर पोलीस ठाणे हद्दीत तुकुममधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूरच्या तुकुम परिसरात एका घरासमोर ठेवलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून तब्बल ३१ तोळे सोने उडविल्याची खळबळजनक घटना बुधवारी उघडकीस आली. या सोन्याची अंदाजे किमत १० लाख रुपये असल्याचे समजते. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलीस सुशिलकुमार यांनी स्वत: गटनेचा आढावा घेतला. या प्रकरणातील आरोपी अद्यापही गवसले नाही. तपास सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नायक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, बंडू संभाजी नागरकर व त्यांचा मुलगा पंकज बंडू नागरकर हे मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घरी असलेले एक ३१ तोळे सोने स्टेट बँक आॅफ इंडियाच्या लॉकरमध्ये ठेवण्यासाठी घरून दुचाकीने निघाले. सोने दुचाकीच्या डिक्कीत ठेवले होते. ते सरळ बँकेत न जाता तुकुम येथे पंकज नागरकर यांच्या सासुरवाडीला गेले. दुचाकी घरासमोर लावून बापलेक घरात गेल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात घराच्या बाहेरून काही लोकांचा चोरी झाल्याचा आवाज आला. हा आवाज ेऐकून बंडू नागरकर व पंकज नागरकर बाहेर येऊन बघते तर त्यांच्याच दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले ३१ तोळे सोने चोरट्यांनी लांबविल्याची बाब पुढे आली. यानंतर पंकज नागरकर यांनी दूर्गापूर पोलिसांत धाव घेऊन फिर्याद नोंदविली. अज्ञात आरोपींविरूद्ध पोलिसांनी ३७९ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.