राजुरा: वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात कोळसा चोरी सुरु असून वेकोलिचे अधिकारी व पोलिसाच्या आर्शिवादानेच कोळसा चोरीचा गोरखधंदा सुरु असल्याचीे चर्चा आहे. राजुराचे उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख यांनी तालुक्यातील माथरा रस्त्यावर कोळसा चोरी करुन नेत असताना दोन ट्रक जप्त केल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. एमएच-०१ एच २८८० केजीएन ट्रान्सपोर्ट आणि एमएच-३२ बी-२१९६ या क्रमांकाचा आर्वी ट्रान्सपोर्टचा ट्रक जप्त करण्यात आला असून चालक शारुख खान (३१) घुग्घुस, तुलाराम निर्मलकर (२३) रा. लखमापूर, दिनेश वर्मा (२४) घुग्घुस, जितेंद्र निर्मलकर (२२) रा. लखमापूर यांना पोलिसांनी अटक केली. या कारवाईत कोळसा व ट्रक असा ४ लाख १६ हजारांचा माल जप्त करण्यात आला. यापूर्वी टाटा सुमोमधून कोळसा चोरी होताना दोन टाटा सुमो पोलिसांनी पकडले. यावरून नेहमीच कोळसा चोरी होत असल्याचा संशय असून कोळसा कुठून भरला, कोण अधिकारी गुंतलेले आहेत, याची चौकशी होणे आवश्यक आहे. (शहर प्रतिनिधी)
कोळसा चोरून नेताना दोन ट्रक पकडले
By admin | Updated: February 8, 2017 01:59 IST