शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजारांवर शाळांमध्ये वाजणार आजपासून घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 05:00 IST

शाळा सुरू होणार असल्या तरी प्रत्येक शाळेमध्ये सध्या आर्थिक ठणठणाट आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांचा ताण वाढला आहे. समग्र शिक्षा अभियानाचा सर्व निधी व्याजासह शासनाने परत घेतला आहे. त्यामुळे शाळेची स्वच्छता, सॅनिटायझर यांसह वेळोवेळी येणाऱ्या आर्थिक अडचणी कशा भागवायच्या, असा प्रश्न सध्या शिक्षकांना पडला आहे. अडचणीच्या वेळी पुन्हा ग्रामस्थांसमोरच हात पसरविण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे.

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बंद असलेल्या शाळा आता सुरू होणार असून, जिल्ह्यात दोन हजारांवर शाळांमध्ये आजपासून घंटा वाजणार आहे. शाळा सुरू होणार असल्याच्या निर्णयामुळे पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. दरम्यान, शाळा प्रशासनानेही वर्गातील धूळ साफ केली असून, पुन्हा नव्या दमाने शाळेतील किलबिल सुरू होणार आहे.जिल्ह्यात २ हजार ५०४ शाळा आहेत. यामध्ये १ हजार ६३७ शासकीय, तर ४८९ खासगी शाळा आहेत. शहरी भागातील आठवी ते बारावी तसेच ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्याची शासनाने परवानगी दिली आहे. यामुळे प्रशासनाने शाळांना तसे निर्देश दिले आहे. दरम्यान, शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासंदर्भातील नियोजन पूर्ण केले आहे. शाळा पूणर्णवेळ सुरु राहणार असल्या तरी परीपाठ किंवा इतर कार्यक्रमांवर बंदी आहे. शालेय पोषण संदर्भात अद्यापही निर्णय झाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरूनच जेवणाचा डब्बा आणावा लागणार आहे. त्यातही सामुहिकरित्या बसून जेवणावरही निर्बंध आहे.

अधिकारी देणार भेटीमागील दीड वर्षानंतर आता शाळा सुरू होणार आहे. त्यामुळे या शाळांचे नियोजन तसेच कोरोना नियम, शिक्षकांची उपस्थिती या सर्व बाबींकडे लक्ष ठेवण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनातील अधिकारी शाळांना भेटी देणार आहेत.

शाळांमध्ये ठणठणाट- शाळा सुरू होणार असल्या तरी प्रत्येक शाळेमध्ये सध्या आर्थिक ठणठणाट आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांचा ताण वाढला आहे. समग्र शिक्षा अभियानाचा सर्व निधी व्याजासह शासनाने परत घेतला आहे. त्यामुळे शाळेची स्वच्छता, सॅनिटायझर यांसह वेळोवेळी येणाऱ्या आर्थिक अडचणी कशा भागवायच्या, असा प्रश्न सध्या शिक्षकांना पडला आहे. अडचणीच्या वेळी पुन्हा ग्रामस्थांसमोरच हात पसरविण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे.

पालकांमध्ये आनंद- मागील दीड वर्षापासून शाळा बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. याशिवाय ऑनलाईन शिक्षणामुळे अनेक विद्यार्थी मोबाईलच्या मोहजाळ्यात अडकले होते. त्यामुळे पालकांची चिंता वाढली होती. - आता शाळा सुरू होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे. त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मुलांना ठेवण्याची चिंता मिटली 

शाळा बंद होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. आम्ही शेतात जातो. मुले पूर्वी शाळेत असायची. त्यामुळे चिंता नव्हती. शाळा नसल्याने आपली मुले शाळेविना गावात सुरक्षित कशी राहील, याची भीती प्रत्येक आई-वडिलांना होती. आता शाळा सुरू होणार असल्याने पाल्य किमान दिवसभर शाळेत शिक्षकांसमवेत सुरक्षित राहील. शिवाय शैक्षणिक नुकसानही होणार नाही.- रूपाली लोेहे, पालक, गोवरी

 कोरोना नियमांचे पालन करून शाळा सुुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. विशेषत: शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांनाही शैक्षणिक प्रवाहात आणण्यात येणार आहे.-उल्हास नरडशिक्षणाधिकारी, माध्यमिक

कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. आता शाळा सुरू होणार असल्यामुळे शिक्षक तसेच विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी प्रत्येकाला प्रयत्न करावा लागणार आहे.- जे.डी. पोटेशिक्षण समिती सदस्यजि.प. चंद्रपूर

 

टॅग्स :Schoolशाळा