लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर असलेल्या तथा ब्रम्हपुरी वनविभागाच्या उत्तर वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या मेंडकी नियतक्षेत्र तुलान येथे शुक्रवारी सायंकाळी वाघाने वर्षा जीभकाटे या महिलेवर हल्ला ठार केले. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले. गावकºयांच्या मागणीवरून वनविभागाने शनिवारी वाघाला पकडण्यासाठी दोन पथके तयार केली असून ते वाघाचा शोध घेत आहे.तुलान-मेंढा येथील रहिवासी असलेली सदर महिला दुपारी घरापासून जवळपास दोन किमी अंतरावर असलेल्या शिवारात शेतीकाम करायला गेली असता सदर दुदैर्वी घटना घडली.गावकऱ्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन सदर घटनेची माहिती वनविभागाला व पोलीस विभागाला दिली. माहिती मिळताच उत्तर वनविभागाच्या वनपरिक्षेत्रधिकारी पूनम ब्राम्हणे आपल्या काही कर्मचाºयांसोबत तसेच पोलिसांसोबत घटनास्थळ गाठले. शनिवारी सकाळी ९ वाजेदरम्यान शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी २ वाजता मृतक महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले वाघाने सदर महिलेचा उजवा पाय आणि मानेचा पूर्ण भाग खाऊन टाकला असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले.त्यामुळे या परिसरात पुन्हा एकदा वाघाची दहशत निर्माण झाली असून शेतकरी धास्तावले आहेत. त्यांनी सदर वाघाचा बंदोबस्त होईपर्यंत शेतावर न जाण्याचा पवित्रा घेतला आहे. वनविभागाने मृतकाच्या कुटुंबीयांना २० हजार रुपयांची तातडीची मदत केली आहे तर चार लाख ८० हजार रुपयांचा धनादेश लवकरच देण्यात येत असल्याचे वनविभागाने सांगितले आहे. या घटनेमुळे परिसरात मात्र दहशतीचे वातावरण आहे.वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आले असून परिसरात वनविभागाचे कर्मचारी गस्त घालत आहेत. लवकरच सदर वाघाचा बंदोबस्त करण्यात येईल. त्यादृष्टीने वनविभागातील कर्मचाºयांचे प्रयत्न सुरु आहेत.-पुनम ब्राह्मणे,उत्तर वनपरिक्षेत्राधिकारी, ब्रम्हपुरी.
‘त्या’ वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी दोन पथके तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 06:00 IST
गावकऱ्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन सदर घटनेची माहिती वनविभागाला व पोलीस विभागाला दिली. माहिती मिळताच उत्तर वनविभागाच्या वनपरिक्षेत्रधिकारी पूनम ब्राम्हणे आपल्या काही कर्मचाºयांसोबत तसेच पोलिसांसोबत घटनास्थळ गाठले. शनिवारी सकाळी ९ वाजेदरम्यान शवविच्छेदन करण्यात आले.
‘त्या’ वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी दोन पथके तयार
ठळक मुद्देगावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण