शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
2
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
3
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
4
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
5
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
6
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
7
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
8
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
9
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
10
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
11
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
12
सोनिया गांधींना भेटण्यासाठी जात होतात त्याचे काय? योगेश कदम यांचा उद्धव ठाकरेंना टोला
13
Laxman Hake : "फडणवीसांनी अजितदादांच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, नाहीतर तुमचं..."; लक्ष्मण हाके संतापले
14
आरोपीची मिरवणूक काढणाऱ्यांचीच ‘वरात’; पोलिसांनी दाखल केला गुन्हा!
15
वसईतील पर्यटनस्थळांवर पोलिसांचा मनाई आदेश; चिंचोटी, देवकुंडी धबधब्यात जाण्यास पर्यटकांना मज्जाव
16
चातुर्मासातील सलग दुसरा भौम प्रदोष: ‘या’ मंत्रांचा अवश्य जप करा; व्रतातील शिवपूजन कसे कराल?
17
मंगला एक्स्प्रेसमध्ये पकडले ३६ कोटींचे ड्रग्ज; मेथाफेटामाईनसह कोकेनही आढळले!
18
पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...
19
"...अन् मी संजीव कुमार यांना ऑटोग्राफ दिला", सचिन पिळगावकरांनी सांगितला तो किस्सा
20
नियमित शस्त्रक्रिया बंद; परिचारिका संपाचा फटका, प्रकृती स्थिर असणाऱ्यांना दिले डिस्चार्ज

तंटामुक्त समितीने लावले दोन प्रेमविवाह

By admin | Updated: June 2, 2015 01:17 IST

महात्मा गांधीे तंटामुक्त समिती वासेराच्यावतीने ग्रामपंचायत कार्यालय परिसरात दोन प्रेमविवाह लावण्यात आले. वासेरा

वासेरा : महात्मा गांधीे तंटामुक्त समिती वासेराच्यावतीने ग्रामपंचायत कार्यालय परिसरात दोन प्रेमविवाह लावण्यात आले. वासेरा येथीलच रहिवासी असलेल्या दोन्ही युवकांच्या या विवाह सोहळ्याला गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वासेरा येथील अमर प्रभाकर आनंदे हा युवक गुजरात राज्यात एका कंपनीत काम करीत असताना ओडिसातीत सरिता आंदेश्वर प्रधान या युवतीसोबत त्याची मैत्री झाली. त्यानंतर मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. यादरम्यान दोघांनीही विवाह करण्याचे ठरविले. त्यानुसार दोघेही वासेरा येथे पोहचले. गावात आल्यावर वासेरा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सदानंद कावळे तथा पोलीस पाटील देवेंद्र तलांडे यांची भेट घेऊन या दोघांनी लग्न करून देण्याबाबत विनंती केली. त्यानुसार तंटामुक्त समितीने लग्नाची तारीखही निश्चित केली. यासोबतच वासेरा येथीलच एक युवक राजेंद्र गुरुदास मेश्राम या युवकाचे दुर्गा कामडी या युवतीसोबत मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दुर्गा ही कोसंबी (ता. नागभीड) येथील रहिवासी असून दोघांचीही भेट एका विवाह प्रसंगात झाली होती. तेथे दोघात मैत्री होऊन त्याचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनीही विवाह करण्याचे ठरविले. मात्र या लग्नाला मुलीकडील कुटुंबाचा विरोध होता. असे असताना मुलीने थेट वासेरा येथे येऊन मुलाची भेट घेतली. त्यानंंतर या दोघांच्याही विवाहाचा प्रस्ताव वासेरा येथील तंटामुक्त समितीकडे दाखल केला. दोन्ही प्रस्तावाचा विचार करुन महात्मा गांधी तंटामुक्त समितीने दोन्ही प्रेमीयुगुलांना कागदाची पुर्तता करण्यात सांगितले व वेगवेगळ्या दिवशी विवाहाची तारीेख ठरवण्यात आली.त्यानंतर वासेरा ग्रामपंचायत कार्यालय परिसरात मंडप डेकोरेशन करुन विवाह थाटामाटात लावण्यात आला. दोन्ही जोडधंदा तंटामुक्त समितीच्यावतीने संसार उपयोगी साहित्य देण्यात आले. या विवाहप्रसंगी वासेरा येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सदानंद कोवळे, देवेंद्र तलांडे , सुनील घाटे, श्यामराव आत्राम, संजय कापकर, भगवान धात्रक, रविंद्र पेंदाम, तेजराम आनंदे, सुनिता आळे, पुंडलिक डोंंगरवार, सत्यवान पेंदाम, गणेश लांजेवार, विजय रामटेके यांच्यासह तंटामुक्त समितीचे सदस्य तसेच गावातील नागरिक वामन बोरकर, विष्णू बोरकर, योगराज आनंदी, डॉ. हेमंत वढे, शंकर नागापुरे, शंकर लांजेवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (वार्ताहर)