शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद! 'त्या' दोन बालिकांच्या समय सूचकतेने वाचवले श्वानाच्या ११ पिल्लांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2022 15:51 IST

बल्लारपुरातील घटना : पिल्ली बाहेर काढल्यानंतर चालला बुलडोजर

मंगल जीवने

बल्लारपूर (चंद्रपूर) : मोठ्यांपेक्षा लहान मुलांनाच प्राण्यांची जास्त आवड असते. प्रसंगी त्यांच्या जीवाची काळजी घेण्यात मुलेच धाडस दाखवू शकतात, हे शहरातील ऋतुजा व कुंजल या दोन बालिकांनी श्वानाच्या ११ पिलांचे प्राण वाचवून सिद्ध केले.

त्याचे असे झाले की, शहरातील बालाजी वाॅर्डात एका जीर्ण घराला बुलडोजरने पाडायचे काम सुरू होते. श्वानाने आपल्या घरात पिल्लांना जन्म दिलाय, याची घर मालकाला माहितीच नव्हती. श्वान घराच्या बाहेर तर पिल्ले घरात अडकली. मात्र, तिला घरात जाता येत नसल्याने टाहो फोडत होती. घराशेजारी राहणाऱ्या मुलींना ते माहीत होते. त्यांनी श्वानाचे ओरडणे ऐकले. त्यांच्या लक्षात आले की, पिलांची आई कशासाठी ओरडत आहे. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता ऋतुजा नावाच्या बालिकेने तिचे बाबा श्रीकांत दवणे यांना माहिती दिली. ही माहिती मिळताच ते धावून घरी आले. घर पाडणाऱ्या बुलडोजरला थांबवून घराच्या बोगद्यात असलेली ११ गोजिरवाणे पिल्ली मुलींच्या मदतीने बाहेर काढली. त्यांना आपल्या घरी आश्रय दिला. त्या पिलांची आई लाडाने कुरवाळत होती. या घटनेने त्या दोन्ही मुलींचे वॉर्डातील नागरिकांनी कौतुक केले.

शहरात प्राणी मित्रांची गरज

बल्लारपुरात मागील काही वर्षांपासून मोकाट श्वान व अन्य पाळीव प्राण्यांची संख्या वाढली. प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे त्यांचा हाकनाक बळी जातो. अशावेळी प्राणी मित्रांची गरज भासू लागली आहे.

टॅग्स :Socialसामाजिकballarpur-acबल्लारपूर