शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

अपघातात मोटरसायकल चालकासह दोन ठार

By admin | Updated: October 11, 2014 23:02 IST

विरूद्ध दिशेने वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात दोनजण जागीच ठार झाले. ही घटना १० आॅक्टोबरच्या रात्री १० वाजताच्या सुमारास कोंढा फाट्याजवळ घडली.

भद्रावती : विरूद्ध दिशेने वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात दोनजण जागीच ठार झाले. ही घटना १० आॅक्टोबरच्या रात्री १० वाजताच्या सुमारास कोंढा फाट्याजवळ घडली. आरोपी ट्रक चालकाला ताब्यात घेण्याच्या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांनी पोलीस ठाण्याला घेराव करून नारेबाजी केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.१० आॅक्टोबरला रात्री १० वाजताच्या सुमारास नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील कोंढा फाट्याजवळ ट्रॅक्टर (एम.एच. ३४ एल. ७८२८) हे विरूद्ध दिशेने भद्रावतीकडे येत असताना याच रस्त्यावरून दुचाकी (एमएच ३४ ए.जी. ४४२८) चा चालक भिमा नथ्थू वडसकर (२०) आणि त्याच्यासोबत चिन्ना भिमा दांडेकर (१९) रा. हनुमान वॉर्ड वरोरा हे वरोऱ्याकडे जात असताना कोंढा फाट्याजवळ ट्रॅक्टरने धडक दिली. यात भिमाचा जागीच मृत्यू झाला, तर चिन्नाला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. ही घटना घडताच ट्रॅक्टर चालक घटना स्थळावरून पसार झाला. अपघातानंतर अज्ञात ट्रॅक्टर चालकाला अटक करा, या मागणीसाठी भद्रावती पोलीस ठाण्याला मृताच्या नातेवाईकासह काही नागरिकांनी एकच गर्दी केली होती. त्यामुळे येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. येथील पोलीस निवडणूक आणि प्रचार सभेमुळे व्यस्त असल्याने काही काळ पोलिसांची तारांबळ उडाली. मात्र येथील एपीआय, ज्ञानेश्वर आव्हाड, एपीआय गजभिये यांच्यासह शिपायांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. अज्ञात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)