शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

नफ्याचे आमिष दाखवून नावावर दोन कोटींनी गंडविणारा अखेर जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 16:24 IST

दोन कोटींचा गंडा घालून फरार झालेल्या चंद्रपुरातील पंकज पुरुषोत्तम फुलझेले याच्या तब्बल तीन वर्षांनी स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. त्याला पालघर येथून अटक करण्यात आली आहे.

चंद्रपूर : २०१५ ओरिएंट ॲण्ड ओझस बायोटेक नावाची कंपनी व वर्कदंत सोयायटी वाडी, नागपूर येथे स्थापन करून काहींना एजंट म्हणून नोकरीला ठेवले. त्यांच्या ओळखीतल्या लोकांकडून कंपनीमध्ये आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून पैसे गुंतवणूक करायला लावले. या माध्यमातून दोन कोटींचा गंडा घालून फरार झालेल्या चंद्रपुरातील पंकज पुरुषोत्तम फुलझेले (रा. गंजवार्ड) याच्या तब्बल तीन वर्षांनी स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. त्याला पालघर येथून अटक करण्यात आली आहे.

पंकज फुलझेले याने सुरुवातीला गुंतवणूकदारांना आकर्षक व्याजदर देऊन लोकांचा विश्वास संपादन केला. या आमिषाला बळी पडून लोकांनी २ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. या बळी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक सेवानिवृत्तांचा समावेश आहे. काही दिवसानंतर त्याने व्याज देणे बंद केले. गुंतवणूकदारांनी पैसे परत मागितले, तेव्हा फुलझेलेने व्याज वा मुद्दलही दिले नाही. अखेर काहींनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. येथील रामनगर पोलिसांनी १५ एप्रिल २०१९ रोजी कलम ४२०, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला. यानंतर पंकज फुलझेले हा कुटुंबासह फरार झाला. या प्रकरणाच्या तपासाची धुरा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्यावर सोपवली.

तांत्रिक तपासाअंती आरोपी पालघर जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली. या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे व पोलीस हवालदार अभय मुर्तरकर यांना पालघरला रवाना केले. पंकज फुलझेले याला येथील लक्ष्मी लाॅजमधून ताब्यात घेण्यात आले. त्याला चंद्रपूर रामनगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे, अनुप डांगे, जमीर पठाण, मिलिंद चव्हाण, दिनेश चरडे, प्रमोद कोटनाके यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. रामनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खरसान याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकfraudधोकेबाजी