शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

बारावीत मुलींनीच मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 23:36 IST

फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज बुधवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८६.८२ टक्के लागला. विदर्भातील निकालात चंद्रपूर जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे. मागील अनेक वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही बारावीत मुलींनीच बाजी मारून मुलांच्या तुलनेत अव्वल राहिल्या.

ठळक मुद्देचंद्रपूर तालुका अव्वल : जिल्ह्याचा निकाल ८६.८२ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज बुधवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८६.८२ टक्के लागला. विदर्भातील निकालात चंद्रपूर जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे. मागील अनेक वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही बारावीत मुलींनीच बाजी मारून मुलांच्या तुलनेत अव्वल राहिल्या.चंद्रपूर जिल्ह्यातून एकूण २९ हजार २८४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील २९ हजार २७१ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. यार्पैकी एकूण २५ हजार ४१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील तब्बल एक हजार ९९ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. सात हजार १२१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. १५ हजार ६२० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तर एक हजार ५७३ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. विदर्भात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल पाचव्या क्रमांकावर आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाची टक्केवारी अधिक असली तर विदर्भात सर्वच जिल्ह्याची निकालाची टक्केवारी चांगली असल्याने जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे.मागील वर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बारावीच्या परीक्षेत आपल्या हुशारीची चुणूक दाखविली. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत एकूण १५ हजार १५९ मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील १५ हजार १५० मुले परीक्षेला बसली. यातील १२ हजार ६६४ मुले उत्तीर्ण झालीे. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८३.५९ आहे.यासोबतच एकूण १४ हजार १२५ मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील १४ हजार १२१ मुलींनी परीक्षा दिली. यातून १२ हजार ७४९ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ९०.२८ आहे.विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिकबारावी परीक्षेत विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. विज्ञान शाखेतून एकूण १० हजार ९४० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील १० हजार ९३७ विद्यार्थी परीक्षेला बसले. यातून १० हजार ४२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ६३६ विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले असून तीन हजार ६९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेची टक्केवारी ९५.३५ आहे. कला शाखेतून एकूण १४ हजार ६५८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील १४ हजार ६५२ विद्यार्थी परीक्षेला बसले. पैकी ११ हजार ८९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेची टक्केवारी ८१.२० आहे. कॉमर्स शाखेतून एकूण दोन हजार ८० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील दोन हजार ७९ विद्यार्थी परीक्षेला बसली. पैकी एक हजार ८३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. कॉमर्स शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ८८.२२ आहे. तर एमसीव्हीसी (व्होकेशनल) प्रकारातून एक हजार ३ विद्यार्थ्यांपैकी एक हजार २५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेची टक्केवारी ७८.२३ इतकी आहे.शहरी विद्यार्थ्यांची ग्रामीणवर मातजिल्ह्यातील सर्व तालुक्याचा निकाल बघता शहरी विद्यार्थ्यांनी निकालात ग्रामीण विद्यार्थ्यांवर मात केल्याचे दिसून येते. चंद्रपूर जिल्ह्यातून चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, मूल, नागभीड, भद्रावती या तालुक्यांचा निकाल चांगला लागला आहे. त्या तुलनेत पोंभूर्णा, गोंडपिपरी, चिमूर, सिंदेवाही या तालुक्यांतील मुले निकालात मागे पडली आहे.सभापती व त्यांचे पुत्र उत्तीर्णजिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनी यावर्षी जनता विद्यालय, घुग्घुस येथून बारावीची इंग्रजी विषयाची परीक्षा दिली होती. यासोबत त्यांचे पुत्र गणेश ब्रिजभूषण पाझारे हाही यावेळी बारावीचा नियमित विद्यार्थी होता. त्याने नागपूर येथील मिल्ट्री भोसला स्कूल येथून बारावीची परीक्षा दिली होती. गणेशने बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलीच; सोबतच समाज कल्याण सभापती असलेले त्याचे वडील ब्रिजभूषण पाझारे हेदेखील ५० टक्के गूण घेऊन बारावी उत्तीर्ण झाले आहेत.पोंभूर्णा तालुका पिछाडीवरयंदाच्या बारावी परीक्षेच्या निकालात चंद्रपूर तालुका जिल्ह्यात अव्वल राहिला. या तालुक्याचा निकाल ९०.०९ टक्के लागला. जिवती तालुका ८८.२२ टक्के घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिला तर पोंभूर्णा तालुका पिछाडीवर गेला आहे. या तालुक्याचा निकाल ७०.५० टक्के लागला.