चंद्रपूर : श्री संत गाडगेबाबा धोबी वरठी समाज महिला मंडळ, चंद्रपूरतर्फे मकर संक्रांतनिमित्त गाडगेबाबा स्मृती भवन, दादमहल वॉर्ड येथे रविवारी हळदी-कुंकू कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अल्का ठाकरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून अपेक्षा वंदिले, हर्षिता वाघमारे, नीलिमा बंडीवार, जिल्हाध्यक्ष संगीता दरुतकर, नंदिनी चुनारकर, कल्पना ठेंभेकर, रंजना जाधव आदी उपस्थित होते. यावेळी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. दैनंदिन जीवनात स्त्रियांनी आपले घर सांभाळून आपल्या शरीर व तब्बेतीची काळजी कशी घ्यायची, याबाबत हर्षिता वाघमारे व अपेक्षा वंदिले यांनी प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन केले. प्रास्ताविक संगीता दुरुतकर यांनी केले. माधुरी चिंचोळकर यांनी संचालन केले. विद्या येलमुलवार यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी नीलिमा रोहनकर, लता नल्लुरवार, मंगला लोणारे, ममता तुंगीडवार, संगीता गोरडवार, विद्या येलमुलवार, अनु चुनारकर, ज्योती तंगडपल्लीवार, अंजू लोणारे, राधा तुराणकर, रिता रोहणकर, माया लोणारवार, कल्पना चुनारकर, प्रतिभा चुनारकर आदींनी प्रयत्न केले.
धोबी समाज महिला मंडळातर्फे हळदी-कुंकू कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:28 IST