ठळक मुद्देआशुतोष सलिल : मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठाणतर्फे सत्कार
<p>लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सर्वसामान्य जनतेच्या सेवेतच खरा आनंद आहे़ जिल्ह्यातील जनतेने मला भरपूर स्रेह दिला़़ हे मी कदापि विसरू शकत नाही, अशी भावना जिल्हाधिकारी आशुतोष सलिल व्यक्त केली़ स्थानांतरानंतर उच्च शिक्षणासाठी विदेशात जाण्यापूर्वी आयोजित निरोप समारंभात ते बोलत होते़कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे तर प्रमुख अतिथी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊनकर, अॅड. रवींद्र भागवत, माजी कुलगुरू डॉ. विजय आर्इंचवार, प्राचार्य राजेश इंगोले, मनोवेध प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विजय बदखल, प्रशांत आर्वे आदी उपस्थित होते. चंद्रपूरचे प्रेम कधीच विसरणार नाही, वेगवेगळ्या पदांवर काम करीत असताना बराच काळ येथे सेवा देता आली. त्यामुळे ऋणानुबंध जुळल्याची भावना सलिल यांनी व्यक्त केली़ जिल्ह्यातील शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक पर्यावरण, वन्यजीव क्षेत्रातील विविध समस्या आणि विकास कामांच्या दृष्टीने जिल्हाधिकारी सलिल यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली होती़ उपविभागीय अधिकारी, मुख्य कार्यकरी अधिकारी आणि जिल्हाधिकारी या तिन्ही पदावर कार्यरत राहुन त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमठविला होता. सामान्यातील सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला, असे मत देवराव भोंगळे यांनी व्यक्त केले. अॅड. भागवत, डॉ. आर्इंचवार, पाऊनकर, प्राचार्य इंगोले यांनीही विचार मांडले. प्रास्ताविक मनोवेधचे अध्यक्ष प्रा. विजय बदखल संचालन प्रशांत आर्वे यांनी केले. यावेळी संजय धवस, किसन नागरकर, शैलेंंद्र राय, संतोष कुचनकर, गिरीश बदखल, मनोज साळवे, अविनाश देव उपस्थित होते़सामान्य जनतेच्या सेवेतच खरा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 21:38 IST