आॅनलाईन लोकमतपोंभूर्णा : पोंभुर्ण्यावरून मूलकडे जाणाºया महामंडळाच्या बसला विरुध्द दिशेने येणाºया ट्रकने धडक दिली. यात बसमधील १२ प्रवासी गंभीर जखमी झाले. यात बसचालकाचाही समावेश आहे. या घटनेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. सदर घटना सोमवारी येथील राईसमीलजवळील वळणावर दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.पोंभुर्ण्यावरून एमएच ४०-८५११ या क्रमांकाची बस मूलकडे जात होती. दरम्यान, मूलवरून पोंभुर्ण्याकडे येणाºया ट्रकने (क्र. एमएच ३४)े बसला धडक दिली. यात ट्रक व बसचा समोरचा भाग पूर्णपणे दबला गेला. यामध्ये बसमधील १२ प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांना प्राथमिक रुग्णालय पोंभुर्णा येथे दाखल करण्यात आले आहे.जखमींमध्ये वंदना कुमरे रा. वलणी बोर्डा, पूनम कोकोडे (६) रा. वडकुली, कल्याणी विजय (१७) रा. मूल, शरद पूनकटवार (४९) रा. गडचिरोली, सुधाकर गेडाम (४०) रा. बोर्डा दीक्षित, गणपत सातपुते (५०) रा. जाम तुकूम, काजल बुरांडे (१९) रा. जामखुर्द, कमल घोंगडे (४०) रा. जाम खुर्द, कासुबाई सातपुते (६०) रा. जाम तुकूम, राजेश्वरी मोगरकार (१८) रा. देवाडा खुर्द, दशरथ ढोले (६७) रा. कांतापेठ यांचा समावेश आहे.एका महिलेला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रकने बसला धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांचे म्हणणे आहे. अपघातानंतर ट्रकचालक तिथून पसार झाला व स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले. अधिक तपास ठाणेदार बोरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोंभुर्णा पोलीस करीत आहे.
ट्रकची बसला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:08 IST
पोंभुर्ण्यावरून मूलकडे जाणाºया महामंडळाच्या बसला विरुध्द दिशेने येणाºया ट्रकने धडक दिली. यात बसमधील १२ प्रवासी गंभीर जखमी झाले.
ट्रकची बसला धडक
ठळक मुद्देपोंभूर्णातील घटना : १२ प्रवासी गंभीर जखमी