कोळसा वाहतूक करणाऱ्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाच्या रेलिंगला धडक बसून ट्रक नदीत कोसळला. ही घटना वर्धा नदी मुंगोली पुलावर सोमवारी रात्री १० च्या सुमारास घडली. या अपघातात ट्रक चालक दीपक दुर्वे हे जखमी झाले असून त्यांच्यावर वेकोलिच्या राजीव रतन रुग्णालयात उपचार सुरू आहे. पुलाच्या काही रेलिंग पुरात वाहून गेल्याने या पुलावर गेल्या अनेक दिवसांपासून सतत अपघातत घडत आहे.
ट्रक नदीत कोसळला...
By admin | Updated: July 29, 2015 00:47 IST