शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रिपल धमाका! या ‘सुपर मॉम’ने जुळ्या मुलींसह बारावी केली उत्तीर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 02:31 IST

मनात जिद्द असली की कोणतीही गोष्ट असाध्य नाही. शिक्षण कमी असल्याची खंत बाळगणाऱ्या एका आईने आपल्या जुळ्या मुलींसह इयत्ता बारावीची परीक्षा दिली. आणि ती चक्क ५८ टक्के गुणांसह उत्तीर्ण करून आपणही ‘सूपर मॉम’ असल्याचे दाखवून दिले.

- सतीश जमदाडे

चंद्रपूर : मनात जिद्द असली की कोणतीही गोष्ट असाध्य नाही. शिक्षण कमी असल्याची खंत बाळगणाऱ्या एका आईने आपल्या जुळ्या मुलींसह इयत्ता बारावीची परीक्षा दिली. आणि ती चक्क ५८ टक्के गुणांसह उत्तीर्ण करून आपणही ‘सूपर मॉम’ असल्याचे दाखवून दिले. या सुपर मॉमने इयत्ता दहावीची परीक्षासुद्धा आपल्या जुळ्या मुलींसोबत दिली होती. आणि तब्बल ७१.२० टक्के गुण घेऊन बाजी मारली होती.कल्पना देविदास मांदाडे रा. आवाळपूर ता. कोरपना असे या सूपर मॉमचे नाव आहे. त्यांना सौंदर्या आणि ऐश्वर्या या दोन जुळ्या मुली आहे. त्यांनी जिवती तालुक्यातील शेणगाव येथील प्रियदर्शिनी विद्यालयातून नियमित विद्यार्थी म्हणून बारावीची परीक्षा दिली. तर मुलगी सौंदर्याने चंद्रपूर येथील एफ.ई.एस. गर्ल्स कनिष्ठ महाविद्यालयातून नियमित विद्यार्थी म्हणून परीक्षा दिली. तिने ६५ टक्के गुण पटकावले तर आणि ऐश्वर्याने प्रभू रामचंद्र विद्यालय नांदा ता. कोरपना येथून परीक्षा दिली. तिला ५५ टक्के गुण मिळाले. या आई-मुलींचे यश परिसरात कौतुकाचा विषय ठरले आहे.

कल्पना देविदास मांदाडे यांना समाजसेवेची आवड आहे. समाजाचे ऋण फेडायचे हाच त्यामागचा हेतू. समाजात वावरताना आपले शिक्षण कमी आहे. ही सल मात्र त्यांच्या मनाला बोचत होती. त्या नित्यनेमाने जुळ्या मुलींचा अभ्यास घेत. अशातच न कळत त्यांच्यातही शिक्षणाची आवड निर्माण झाली. आणि आता शाळेत जायचेच हा विचार पक्का झाला. आणि या सूपर मोमचा नवा प्रवास सुरू झाला. गॅप सर्टिफिकेट काढून इयत्ता दहावीत प्रवेश घेतला. मुलीही दहावीत गेल्या होत्या. मुलींसोबत आता आईचाही अभ्यास सुरू झाला. मुलींसोबत कल्पना मांदाडे यांनी दहावीची परीक्षा दिली आणि उत्तीर्ण केली.

सौंदर्याने ८० टक्के तर ऐश्वर्याने ७० टक्के गुण घेतले होते, तर या सूपर मॉमने तब्बल ७१.२० टक्के गुण घेऊन आपणही कमी नसल्याचे दाखवून दिले होते. यावर्षी या तिन्ही मायलेकी नियमित विद्यार्थिनी म्हणून बारावीच्या परीक्षेला बसल्या. आणि तिघीही या परीक्षेतसुद्धा उत्तीर्ण झाल्या. कल्पना मांदाडे यांनी केवळ परीक्षा उत्तीर्ण केली नाही, तर शिक्षणाची आवड मनातच ठेवणाºया महिलांपुढे नवा आदर्श ठेवला आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल