शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
3
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
4
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
5
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
6
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
7
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
8
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
11
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
13
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
14
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
15
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
16
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
17
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
18
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
19
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
20
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 

आदिवासी कुटुंबाची जमीन हडपली

By admin | Updated: September 1, 2016 01:27 IST

येथील चंद्रभान धोंडू जुमनाके या आदिवासी कुटुंबाची वडिलोपार्जित जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे हडप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

बनावट दस्तऐवजांचा वापर : घोडपेठ तलाठी कार्यालयाचा प्रतापघोडपेठ : येथील चंद्रभान धोंडू जुमनाके या आदिवासी कुटुंबाची वडिलोपार्जित जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे हडप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.स्वत:ची हक्काची जमीन परत मिळविण्यासाठी या आदिवासी शेतकऱ्याची शासनदरबारी पायपीट सुरू आहे. मात्र, या प्रकरणाने घोडपेठ येथील तलाठी कार्यालयातील कामकाजाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून परिसरातील शेतकऱ्यांमध्येही आपल्या शेतजमिनीच्या कागदपत्रांसंदर्भात भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे.घोडपेठ येथील आदिवासी महिला गुजी राघो जुमनाके यांची घोडपेठ येथे भुमापन क्र. २२५/ब, आराजी १ हेक्टर ४३ आर एवढी वडिलोपार्जित शेतजमीन होती. गुजी जुमनाके यांच्या मृत्यूनंतर वारसाहक्काने त्यांच्या दोन मुलांचा सातबारा उताऱ्यावर फेरफार घेण्यात आला होता.गुजी राघो जुमनाके यांचे वारसदार धोंडू जुमनाके व चिरकुटा जुमनाके यांचा मृत्यू अनुक्रमे २१ मार्च २००२ तसेच ३ डिसेंबर २०११ रोजी झाला. त्यांच्या मृत्यूनंतर वारसाहक्काने या शेतजमिनीवर धोंडू व चिरकुटा यांच्या वारसदारांच्या नावाचा फेरफार करणे घोडपेठ येथील तलाठी कार्यालयाकडून अपेक्षित होते.मात्र, दोन महिन्यांपूर्वी चंद्रभान धोंडू जुमनाके यांनी घोडपेठ येथील तलाठी कार्यालयातून सदर शेतजमिनीचा गाव नमुना सात घेतला असता या शेतजमिनीवर भोगवटदार म्हणून बबिता बाळू कांबळे रा. घुग्घुस यांचे नाव असल्याचे निदर्शनास आले.तसेच गुजी राघो जुमनाके यांच्या काळात ही शेतजमीन भोगवटदार वर्ग २ मध्ये होती, मात्र सध्या ही जमीन भोगवटदार वर्ग १ मध्ये केल्याचे कागदपत्रांवरून लक्षात येत आहे.बनावट कागदपत्रे तयार करून आदिवासी असलेल्या जुमनाके परिवाराची जमीन हडप करण्यात येत असल्याचे लक्षात आल्यानंतर चंद्रभान धोंडू जुमनाके यांनी या प्रकरणाची रितसर तक्रार तहसीलदार तसेच भद्रावती पोलिसात केली. तहसीलदारांनी या प्रकरणी लक्ष घालून दोषींवर कडक कारवाई करावी. तसेच आपली वडिलोपार्जित व हक्काची शेतजमीन परत करावी, अशी मागणी घोडपेठ चंद्रभान जुमनाके यांनी केली आहे. (वार्ताहर)माहिती दिली नाहीबनावट कागदपत्रे वापरून आपली शेतजमीन हडप केल्याचे लक्षात आल्यानंतर चंद्रभान जुमनाके यांनी या शेतजमिनीवर गुजी जुमनाके यांचे नाव असताना बबिता बाळू कांबळे यांचे नाव कशाच्या आधारे चढविण्यात आले व कोणत्या वर्षी चढविण्यात आले, याची माहिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार भद्रावती यांना माहितीच्या अधिकारात मागितली. मात्र, मागितलेली माहिती ही प्रश्नार्थक स्वरूपाची असल्याने माहिती पुरवता येत नाही, असे लेखी उत्तर नायब तहसीलदारांनी दिले.