शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

मिशनमोड स्वरूपात वृक्षलागवड करावी

By admin | Updated: May 10, 2017 00:43 IST

राज्यात १ ते ७ जुलै या वनमहोत्सवाच्या कालावधीत चार कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असून ....

सुधीर मुनगंटीवार : विभागीय आयुक्तांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवादलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यात १ ते ७ जुलै या वनमहोत्सवाच्या कालावधीत चार कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असून सर्व शासकीय यंत्रणेने हे काम मिशनमोड स्वरूपात हाती घ्यावे. तसेच कामाचे नियोजन व आतापर्यंत केलेले काम वन विभागाने दिलेल्या नमून्यात संकेतस्थळावर अपलोड करावे, अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.वनमंत्री मुनगंटीवार यांनी पुणे, कोकण, नागपूर आणि अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी या वृक्ष लागवडी संदर्भात व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे संवाद साधला त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.वसुंधरेचे ऋण फेडण्याची वेळ आली आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन वृक्षलागवडीच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करून सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, वनमहोत्सवाच्या निमित्ताने राज्यात १ ते ७ जुलै या कालावधीत चार कोटी वृक्ष लागवड होणार आहे यामध्ये वन विभागामार्फत २.२५ कोटी, इतर शासकीय विभागांकडून ७५ लाख आणि ग्रामपंचायतींकडून १ कोटी वृक्ष लागवड होणार आहे. वृक्ष लागवडीबरोबर वृक्ष जगवण्यावर ही भर दिला जावा, असे सांगून ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत, आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम आणि महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ही निधी उपलब्ध होऊ शकेल. त्यासाठी बिहार पॅटर्नचा अवलंब करावा, असेही ते म्हणाले. अनेक बँकांकडून ट्री गार्ड खरेदी करण्यासाठी त्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून पैसे मिळू शकतात, त्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. शासकीय यंत्रणेबरोबरच वृक्ष लागवडीच्या कामात व्यापक लोकसहभाग मिळवावा, यासाठी मोठ्याप्रमाणात जनजागृती केली जावी, असे सांगून मुनगंटीवार म्हणाले की, यामध्ये शालेय- महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक- अध्यात्मिक संस्था, स्वंयसेवी संस्था, स्काऊट-गाईड, रोटरी, यांचेदेखील सहकार्य घेण्यात यावे. वृक्ष लागवडीत व्यक्ती-संस्थांना बक्षीस देणार- सुधीर मुनगंटीवारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वृक्षलागवडीची मनामनात ज्योत पेटवताना या सर्वांसोबत शासकीय यंत्रणेने एक वृक्ष सहकार निर्माण करावा. यासाठी गावागावात वातावरण निर्मिती केली जावी. वृक्ष लागवडीची घोषवाक्ये, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आयोजित व्हावी,गावात वृक्ष दिंडी काढली जावी. वृक्ष लागवडीच्या कामात सर्व पक्षीय लोकांचा सहभाग घेण्यात यावा. चांगले काम करणाऱ्या व्यक्ती संस्थांची नावे विभागाकडे कळविण्यात यावीत. त्यांना प्रोत्साहनपर प्रशस्तीपत्र विभागाकडून दिले जाईल, असे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.वन विभाग हा या कार्यक्रमात सर्वांसाठी समन्वयक आहे. या विभागाने सर्वांना सोबत घेऊन वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यशस्वी करावा. प्रत्येक जिल्ह्यात या कामासाठी एका नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. नियुक्त केलेल्या समन्वयकांची माहिती देणारी पुस्तिका प्रत्येक जिल्ह्यात प्रसिद्ध केली जावी. वृक्ष लागवडीच्या जागांची निश्चिती व्हावी, जिथे वृक्ष लावायचे तिथले खड्डे हे योग्य आकाराचे असावेत असे सांगतांना हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी छोटछोट्या गोष्टींची काळजी घेतली जावी असेही ते म्हणाले.राज्यात होणा?्या वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम ३१ मे पूर्वी पूर्ण करावे अशा सूचना वनसचिव विकास खारगे यांनी यावेळी दिल्या. ते म्हणाले की प्रत्येक विभागात वनमंत्री पालकमंत्र्यांना आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन वृक्षलागवडीसंदर्भात बैठका घेणार आहेत. त्यापूर्वी ज्या ठिकाणी वृक्ष लावायचे त्या जागांची निश्चिती होणे, समन्वयकांची पुस्तिका प्रकाशित होणे, खड्डे खोदण्याचे काम पूर्ण होणे आणि यासंदर्भात केलेले नियोजन पूर्णत्वाला जाणे आवश्यक आहे. याकामात लोकांना सहभागी करून घेतांना जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीच्या चार पत्रकार परिषदा घ्याव्यात, जिल्हा माहिती अधिकाऱ्यांचे सहकार्य घेऊन वृक्ष लागवडीपूर्वीच्या छोट्या-मोठ्या घटनांची माहिती बातमी, लेख स्वरूपात दिली जावी आणि महाराष्ट्राने इतर राज्यांसाठी या क्षेत्रात प्रेरणादायी काम करून दाखवावे, असेही ते म्हणाले. विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त रोहयो, जिल्हाधिकारी कार्यालयात उप जिल्हाधिकारी रोहयो यांची समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.गतवर्षी लावलेल्या रोपांमधील जगलेल्या रोपांमध्ये वन विभागांच्या रोपांची टक्केवारी ही ८० टक्क््यांहून अधिक असल्याची माहिती या व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे देण्यात आली. यावर्षीच्या ४ कोटी वृक्ष लागवडीचे काम अंतिम टप्प्यात असून रोपवाटिकांमधून दर्जदार रोपे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.