लोकमत न्यूज नेटवर्कपोंभुर्णा : मुलगी झाल्याचा आनंद काहीच कुटुंब साजरे करतात. पण तो आनंद जर वृक्ष लागवड करून केला जात असेल तर तो आगळावेगळाच ठरेल. असाच मुलगी झाल्याचा आनंद पोंभुर्णापासून जवळच असलेल्या चक फुटाणा येथील भाऊराव अर्जुनकर यांनी वृक्षलागवड करून व्यक्त केला.राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून १३ कोटी वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम राज्यात राबविला जात आह. या उपक्रमार्तंगत चंद्रपूर जिल्ह्यात ७७ लाख वृक्षारोपण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून चक फुटाणा येथील सरपंच तुळशिराम रोहणकर यांनी पुढाकार घेतला आहे. गावातील भाऊराव अर्जुनकर यांना मुलगी झाल्याचे त्यांना माहित होताच आनंद द्विगुणीत करण्यासाठी वृक्ष लागवड करण्याची संकल्पना मांडली. याला अर्जुनकर कुटुंबीयांनी होकार दर्शविला व वृक्षारोपणाप्रती आगळावेगळा आदर्श निर्माण केला.वृक्षारोपण करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर रामगीरकर, आशा वर्कर लता रोहणकर, संदेश झाडे, गावातील नागरिक उपस्थित होते. यावेळी मुलीच्या जन्माप्रीत्यर्थ एक झाड लावून १३ कोटी वृक्ष लागवड अभियानाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
मुलगी झाल्याच्या आनंदात वृक्षलागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 23:28 IST
मुलगी झाल्याचा आनंद काहीच कुटुंब साजरे करतात. पण तो आनंद जर वृक्ष लागवड करून केला जात असेल तर तो आगळावेगळाच ठरेल. असाच मुलगी झाल्याचा आनंद पोंभुर्णापासून जवळच असलेल्या चक फुटाणा येथील भाऊराव अर्जुनकर यांनी वृक्षलागवड करून व्यक्त केला.
मुलगी झाल्याच्या आनंदात वृक्षलागवड
ठळक मुद्देउपक्रमाचे कौतुक : फुटाणा सरपंचाचा पुढाकार