शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

डीईआयसीतून दिव्यांग बालकांवर उपचार होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:31 IST

जन्माला येणारी दिव्यांग बालके गरीब कुटुंबाला आयुष्यभरासाठी भार असल्यासारखे वाटतात. काही पालक आपल्या परिस्थितीअभावी अशा बालकांची उत्तरायुष्यात काळजी व योग्य उपचार करू शकत नाही.

ठळक मुद्देहंसराज अहीर : जिल्हा सामान्य रुग्णालयात डीईआयसी इमारतीचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जन्माला येणारी दिव्यांग बालके गरीब कुटुंबाला आयुष्यभरासाठी भार असल्यासारखे वाटतात. काही पालक आपल्या परिस्थितीअभावी अशा बालकांची उत्तरायुष्यात काळजी व योग्य उपचार करू शकत नाही. मात्र, अशी बालके जन्मताच योग्य उपचार पद्धतीने दुरूस्त करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात डिस्ट्रिक्ट इंटरव्हेन्शन सेंटरची सुरुवात करताना मला आनंद होत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. डिस्ट्रिक इंटरव्हेन्शन सेंटर इमारतीच्या भूमिपूजनाप्रसंगी गुरूवारी ते बोलत होते.यावेळी आमदार नाना शामकुळे, महापौर अंजली घोटेकर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र्र पापळकर, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. प्रमोद राऊत, जि. प. समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे आदी उपस्थित होते. नवजात अर्भकाला जन्मताच योग्य उपचार मिळावा यासाठी आवश्यक असणाऱ्या डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेशन सेंटर (डीईआयसी) अर्थात नवीन शीघ्र हस्तक्षेप केंद्राची निर्मिती करण्यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी मोलाची भूमिका बजावली. याकरिता अडीच कोटी खर्च करून हे केंद्र जिल्हा सामान्य रूग्णालयात उभाण्यात आले आहे.केंद्रामुळे मुलांमध्ये असणाऱ्या जन्मजात कमतरतेला दूर करण्यास मदत होणार आहे. जन्मजात दिव्यांग बालकांसाठी अत्याधुनिक उपचार करण्याची सुविधा या केंद्रात राहणार आहे, अशी माहिती ना. अहीर यांनी यावेळी दिली. जिल्ह्यामध्ये उत्तम आरोग्य सुविधा देण्याकडे सातत्याने लक्ष दिल्या जात आहे. डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेशन सेंटर (डीईआयसी) द्वारे आधुनिक सुविधा मिळाव्या, याकरिता निधी कमी पडू देणार नाही, असेही ना. अहीर म्हणाले. एकाच सुसज्ज इमारतीमध्ये पूर्ण वैद्यकीय यंत्रणा व प्रशिक्षित डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हे केंद्र दिव्यांग बालकांना सेवा देणार आहे.यावेळी आमदार शामकुळे, महापौर घोटेकर यांनी मार्गदर्शन केले. संचालन सोनाली गायकी यांनी केले. आभार अश्विनी जुलमे यांनी मानले. आरोग्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर