शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीच नाही, नेपाळच्या सीमेवरून दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात; ३७ जण दबा धरून बसलेत...
2
वेतनवाढीच्या एक दिवस आधी निवृत्त झाले तरी पेन्शनमध्ये लाभ मिळणार : सरकार
3
अपरा एकादशी: पापांचा नाश अन् चुकांना क्षमा; पाहा, महत्त्व अन् मान्यता, ‘अशी’ करा व्रत पूजा
4
ज्योतीने इस्लाम धर्म स्वीकारला, दहशतवाद्यांसोबत संबंध, पाकिस्तानीसोबत लग्न केले?; पोलिसांनी सगळंच सांगितलं
5
कान्सची राणी! कपाळी कुंकू अन् पांढरी साडी परिधान करत ऐश्वर्या रायने दाखवलं भारतीय संस्कृतीचं दर्शन
6
शुक्रवारी अपरा एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, लाभच लाभ; भरभराट काळ, हाती पैसा राहील!
7
पत्रकाराने असा काय प्रश्न विचारला की डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा चढला? म्हणाले "चल निघ इथून..."
8
आजचे राशीभविष्य, २२ मे २०२५: नशिबाची साथ, मान-सन्मान; यश, कीर्ती, धन प्राप्तीचा दिवस
9
जगातील कुठलेही क्षेपणास्त्र राेखणार अमेरिकेचे ‘गोल्डन डोम’ कवच, US ला कुणाचा धोका? 
10
झेलेन्स्कींसारखेच डोनाल्ड ट्रम्प यांचे दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी वाजले; रामाफोसा संबंध सुधारण्यासाठी आलेले...  
11
अयोध्येतील श्रीराम मंदिरात व्हिआयपींशिवाय ५ जून रोजी होणार राम दरबार प्राणप्रतिष्ठा सोहळा
12
केंद्राकडून राज्यपालांचा दुरुपयोग करत राज्य सरकारांच्या कामात अडथळे
13
न्यायालय ऑन ड्युटी; वकिलांना मात्र हवी सुट्टी! सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
14
अबुझमाडच्या जंगलात २७ नक्षलींना कंठस्नान; असे घडले एनकाउंटर
15
‘ॲापरेशन सिंदूर’नंतर रॉचे अधिकारी मराठवाड्यात; केंद्र सरकारकडून अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे सुरू
16
नाव बसवा राजू... इनाम ५ कोटी... १५ नावांची ओळख अन् बनला सर्वोच्च नेता
17
पाकिस्तानात गृहयुद्ध : स्कूलबसवर हल्ला, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश, ३८ जण जखमी 
18
‘पायरसी’मुळे सिनेमाला २२,४०० कोटींचा ‘झटका’; फटका कुणाला?
19
देवनार डम्पिंग ग्राउंडवरील बायोगॅस प्रकल्प २ वर्षांत; राज्य सरकारची मंजुरी; प्रतिदिन १८ टन बायोगॅसची निर्मिती
20
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले

महामंडळाच्या भंगार, अस्वच्छ बसमधून प्रवास

By admin | Updated: May 23, 2015 01:32 IST

बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रिदवाक्य पूर्ण करण्यात ब्रह्मपुरी आगार अपयशी ठरले आहे.

सिंदेवाही: बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रिदवाक्य पूर्ण करण्यात ब्रह्मपुरी आगार अपयशी ठरले आहे. ग्रामीण व शहरी भागाची लोकवाहिनी असलेल्या एसटीची गती काळाच्या ओघात मंदावली असून प्रवाशांची दारोमदार खासगी वाहतुकीवरच आहे. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक फोफावली आहे.प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिद असल्याच्या एसटीची दिवसेंदिवस दुरवस्था कमालीची वाढत आहे. ग्रामीण भागात बसेस वेळेवर सुटत नाही. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते. परिणामी त्या वेळेवर पोहचत नाही. तालुक्याचा आगार ब्रह्मपुरी आहे. जिल्ह्यात चंद्रपूरनंतर ब्रह्मपुरी हाच सर्वात मोठे आगार आहे. या आगारातून अनेक गाड्या भंगार झाल्या असून त्यांना नवीन गाड्यांची प्रतीक्षा आहे. एसटीला लोकाभिमुख करण्यासाठी अनेक योजना अंमलात आणल्या. ग्राहकांना अभिवादन करण्याचीही योजना सुरू केली होती. एसटीचे उत्पन्न वाढावे म्हणून अनेक योजना सुरू करण्यात आल्या. पण त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची गरज झाली नाही. एसटी वाहकांकडून प्रवाशांना अनेकदा अपमानस्पद वागणूक मिळत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. त्यांनाही याबाबत वरिष्ठांकडून सूचना देण्याची गरज आहे. सहकाऱ्यांमध्ये सूचनांंनी सुधारणा होत नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. बसमधील आसनांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. एसटीत धूळ, कागदाचे चिटोरे, प्लास्टिक पिशव्या असतात. मात्र एसटीच्या स्वच्छतेकडे व्यवस्थापकांचे दुर्लक्ष असते. याकडे लक्ष पुरविणे अधिकाऱ्यांना गरजेचे आहे. एसटीला विविध समस्यांचा विळखा पडला आहे.