शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
5
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
6
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
8
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
9
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
10
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
11
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
12
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
13
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
14
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
15
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
16
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
17
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
19
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
20
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक

हल्लेखोर बिबट अडकला पिंजऱ्यात

By admin | Updated: October 22, 2015 00:45 IST

गेल्या काही दिवसांपासून खेडी गावात धुमाकूळ घालून २४ बकऱ्यांना ठार मारणारा बिबट अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात मंगळवारी ११ वाजताच्या दरम्यान अडकला.

सावली : गेल्या काही दिवसांपासून खेडी गावात धुमाकूळ घालून २४ बकऱ्यांना ठार मारणारा बिबट अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात मंगळवारी ११ वाजताच्या दरम्यान अडकला.११ आॅक्टोबर रोजी खेडी येथील सुकरू बुका कंकलवार यांच्या बकऱ्याच्या गोठ्यात शिरून बिबट्याने २१ बकऱ्या ठार मारल्या. तर बंडु पोचू येरेवार यांची एक शेळी मारली. त्यानंतर १८ आॅक्टोबरला पुन्हा खेडी येथीलच गणेश रामा कंचलवार यांच्या गोठ्यातील दोन बकऱ्या ठार केल्या. तेव्हापासून पुढील अनर्थ होऊ नये म्हणून वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी चार पिंजरे लावले होते. त्यापैकी भवराळा गावाजवळील आसोला मेंढा नहरालगत असलेल्या पिंजऱ्यामध्ये सदर बिबट रात्री ११ वाजताच्या दरम्यान अडकला आणि गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.बिबट्याच्या दहशतीत असलेल्या खेडी येथील मेंढपाळ कुटुंबीयांनी वनविभागाचे आभार मानले. अडीच ते तीन वर्षे वय असलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. बकऱ्यांच्या मालकाला नुकसान भरपाई म्हणून प्रत्येक बकरीचे तीन हजार रुपये देण्यात येणार असल्याचे सावलीचे वनपरिक्षेत्राधिकारी एम.पी. राठोड यांनी सांगितले. सदर बिबट्याची रवानगी चंद्रपूरच्या रामबाग नर्सरीत करण्यात आली असून त्याची आरोग्य तपासणी करून योग्य ठिकाणी सोडण्यात येईल असे मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांनी सांगितले. उपविभागीय वनाधिकारी एस.एस. पाटील व सहाय्यक वनसंरक्षक डब्ल्यू.व्ही. मोरे यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक बी.डी. चिकाटे, एस.डी. येलकेवाड, विजय रामटेके, राजू कोडापे यांचेसह वन कर्मचाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)