शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

श्रमदानातून भादुर्णीचा कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:41 IST

गावविकासाचा ध्यास व तळमळ असली की गावाचा कायापालट होऊ शकतो, याचे ज्वलंत उदाहरण मूल तालुक्यातील भादुर्णी गावातील सध्या दिसत असलेल्या दृश्यावरून देता येईल. स्वच्छ भारत संकल्पनेला प्रतिसाद देत आपल्या गावाचा विकास आपल्यालाच करायचा आहे, ...

ठळक मुद्देआत्मविश्वास वाढला : गावात लोकसहभागातून ५० लाखांचे काम

राजू गेडाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : गावविकासाचा ध्यास व तळमळ असली की गावाचा कायापालट होऊ शकतो, याचे ज्वलंत उदाहरण मूल तालुक्यातील भादुर्णी गावातील सध्या दिसत असलेल्या दृश्यावरून देता येईल. स्वच्छ भारत संकल्पनेला प्रतिसाद देत आपल्या गावाचा विकास आपल्यालाच करायचा आहे, या उद्देशाने भादुर्णीवासीयांनी श्रमदानातून गाव विकास साधण्याचा निर्णय घेतला आहे. गावात लोकसहभागातून तब्बल ५० लाख रुपयांचे काम करुन गाव विकासाला हातभार लावला आहे. प्रभु फाऊंडेशन या स्वयंसेवी संघटनेने विशेष जनजागृती केल्याने गावाचा कायापालट होण्याला मदत मिळाली.‘गाव करी ते राव न करी’ या उक्तीप्रमाणे लोकांना श्रमदानाचे महत्व पटले तर गावाचा विकास होण्याला कुणीही रोखू शकत नाही. मूल तालुक्यातील भादुर्णी या गावाची लोकसंख्या एक हजार ५१६ असून प्रभु फाऊंडेशन या स्वयंसेवी संघटनेने गाव विकासासाठी जनजागृती करुन लोकांच्या मनात स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. गावातील युवक- युवती व वृद्धांना सोबत घेऊन गाव विकासाच्या दृष्टीने आराखडा तयार केला. श्रमदानातून गावामध्ये स्वच्छ ग्राम, आदर्श ग्राम निर्मितीकरिता पिण्याच्या पाण्याचे नियोजन, शौच खड्ड्याद्वारे पाण्याची पातळी वाढविणे, घराघरातून निघणाऱ्या सांडपाण्याचे योग्य नियोजन करुन त्याचा शेतबाग, परसबाग फुलविणे, गोठ्यातील गाई-म्हशी व शेळ्या मेंढ्याच्या माध्यमातून निघणाऱ्या मलमुत्राचा वापर शेतात करुन शेती पिकासाला हातभार लावण्याचा प्रयत्नकरण्यात आला. घरातून निघणाऱ्या कचऱ्याचे विलनीकरण करुन खताची निर्मिती करण्याविषयी तंत्रशुद्ध माहिती व प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रभु फाऊंडेशनचे अध्यक्ष राहुल गुळघाणे, सरपंच दिपीका शेंडे, उपसरपंच संतोष रेगुंडवार, सचिव अंकुश दडमल, स्वच्छता समितीचे अध्यक्ष लिलाधर शेंडे, प्रभुदास मांदाडे, अविनाश शेंडे, गोपाल सोनुले, अंकुश बावणे, अतुल बावणे व गावकरी गावविकासासाठी झटत आहेत.गावात लागले सीसीटीव्ही कॅमरेगावात श्रमदान व लोक वर्गणी गोळा करुन स्वच्छता, सौंदर्यीकरण, रस्ते, पाणी व इतर आवश्यक कामे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गावात सर्वत्र स्वच्छता व आरोग्यदायी वातावरणांची निर्मिती झाल्याने गावकऱ्यांचा आत्मविश्वास वाढलां. ग्रामपंचायतीकडून गावातील मुख्य मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. शुद्ध पाण्यासाठी आरओ फिल्टर बसविण्यात आले. सौरउर्जेवरील स्ट्रीट लाईट लावण्यात आले. शोषखड्डे, कंपोस्ट खड्डे तयार करण्यात आले. घनकचरा व्यवस्थापनाकरिता घंटागाडीत ओला व सुका कचरा याचे विघटन करुन ओल्या कचºयापासून खत तयार करण्यात येत आहे.