शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

चार पीआय, १३ एपीआय, १० पीएसआयच्या बदल्या; १५ दिवसांपूर्वी ५० पोलिस अधिकाऱ्यांच्या केल्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 12:50 IST

पोलिस अधीक्षकांचा आदेश : काहींची आवडीच्या ठाण्यांसाठी फिल्डिंग

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : आगामी विधानसभा निवडणूक व जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर नागपूर विभागाचे पोलिस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांचा नुकताच दौरा झाला होता. दौऱ्यानंतर पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी बुधवारी (दि. २९) पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्याचे आदेश जारी केले.

१५ दिवसांपूर्वी ५० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. मात्र आता पुन्हा ४ पोलिस निरीक्षक, १३ सहायक पोलिस निरीक्षक व १० पोलिस उपनिरीक्षक अशा एकूण २७ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. काही पोलिस अधिकाऱ्यांनी आवडीचे ठाणे मिळावे, यासाठी फिल्डिंग लावली होती. मात्र काहींचा हिरमोड तर काहींचे समाधान झाल्याची प्रशासनात चर्चा आहे.

कोण व कुठे सूत्रे हाती घेणार? नियंत्रण कक्षातील सहायक पोलिस निरीक्षक पंकज गजानन वाघोडे यांची टेकामांडवा येथे ठाणेदारपदी, सहायक पोलिस निरीक्षक शरद श्याम भस्मे (वरोरा), नियंत्रण कक्षाचे एपीआय निशांत भीमराव फुलेकर (वरोरा), नियंत्रण कक्षाचे एपीआय पंकज अशोक बैसाणे (चंद्रपूर सिटी), नियंत्रण कक्षाचे एपीआय हेमंत शंकर पवार (राजुरा), नियंत्रण कक्षाचे एपीआय राजेंद्र देवीदास गायकवाड (बल्लारपूर), नियंत्रण कक्षाच्या एपीआय शीतल पवन खोब्रागडे (ब्रह्मपुरी), चिमूर येथील एपीआय प्रमोद रासकर (पाथरी ठाणेदार), पाथरी येथील ठाणेदार संगीता हेलोंडे यांची तळोधी ठाणेदारपदी वणी लागली.

जिंवतीला पहिल्यांदा महिला ठाणेदार जिवती पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दारासिंग राजपूत यांची कोरपना येथे बदली झाली. त्यांच्याजागी जिल्हा विशेष शाखेतील पोलिस निरीक्षक कांचन पांडे यांची ठाणेदारपदी वर्णी लागली आहे. जिवती ठाण्याला पहिल्यांदाच महिला पोलिस ठाणेदार मिळाल्या आहे. घुग्घुस ठाण्याचे दुय्यम अधिकारी प्रदीप पुल्लरवार यांची सावली ठाणेदारपदी तर, रामनगर ठाण्याचे दुय्यम अधिकारी रमाकांत कोकाटे यांची जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात आली. चंद्रपूर शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल गुहे यांची उमरी पोतदार ठाणेदारपदी, तर उमरी पोतदार येथील योगेश हिवसे यांची पडोली ठाणेदारपदी वर्णी लागली. नियंत्रण कक्षातील प्रवीण सोनुने यांची रामनगर येथे तर बल्लारपूर पोलिस ठाण्यातील दीपक कांकेडवार यांची स्थानिक गन्हे शाखेत बदली झाली आहे.

असे आहेत बदलीपात्र ठाणे टेकामांडवा येथील पोलिस उपनिरीक्षक अभिषेक जंगमवार (बल्लारपूर), वणी कॅम्पचे पीएसआय हिराचंद गवारे (रामनगर), नियंत्रण कक्षातील पोलिस उपनिरीक्षक शुभांगी पाटील (भिसी), नियंत्रण कक्षातील पोलिस उपनिरीक्षक प्रेमनाथ देवाजी ठवकर (सिंदेवाही), नियंत्रण कक्षातील पोलिस उपनिरीक्षक मीनल कापगते (बल्लारपूर), नियंत्रण कक्षातील तृप्ती खंडाईत (चंद्रपूर शहर), नियंत्रण कक्षातील पोलिस उपनिरीक्षक रवींद्र रेवतकर ठाणेदार (वणी कॅम्प), नियंत्रण कक्षातील पोलिस उपनिरीक्षक मनोजकुमार रघुनाथ नाले (ब्रह्मपुरी), बल्लारपूर येथील पोलिस उपनिरीक्षक वर्षा नैताम (मूल), चिमूरचे पोलिस उपनिरीक्षक दीपक ठाकरे यांची (वरोरा) येथे बदली करण्यात आली.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर