चंद्रपूर : महसूल विभागातील नऊ मोठ्या अधिकाऱ्यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातून बदल्या झाल्या आहेत. त्यांच्या रिक्त जागी नवे अधिकारी रूजू झाले असून कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्याही बदल्या झाल्या आहेत.चंद्रपूर येथील भूसंपादन अधिकारी म्हणून कार्यरत असलेले पंकज चौघल यांची मागासवर्गीय आयुक्त कार्यालय नागपूर येथे सहायक आयुक्त म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी मूलचे उपविभागीय अधिकारी आर. पी. खजांजी हे भूसंपादन अधिकारी म्हणून आले आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी आर. डी. कुळमेथे यांची आयुक्त कार्यालय नागपूर येथे सहायक आयुक्त म्हणून बदली झाली. त्यांच्या जागी चंद्रपूरचे एसडीओ संजय दैने हे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून आले आहेत. मूल येथे उपविभागीय अधिकारी म्हणून मनिषा दांडगे रूजू झाल्या असून उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दामोधर नान्हे यांची गडचिरोली येथे भूसंपादन अधिकारी म्हणून बदली झाली आहे. चिमुरचे उपविभागीय अधिकारी उरकुडे यांची भंडारा येथे उपजिल्हाधिकारी म्हणून बदली झाली असून त्यांच्या रिक्त जागी श्रीमती राठोड आल्या आहेत. ब्रह्मपुरी येथे एसडीओ म्हणून सीमा अहीरे यांनी पदभार स्वीकारला आहे. तर उपजिल्हाधिकारी (रोहयो) म्हणून विनोद हरकांडे हे चंद्रपूर येथे आले असून चंद्रपूरच्या उपविभागीय अधिकारी म्हणून बल्लारपूरच्या तहसीलदार कल्पना नीळ रूजू झाल्या आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)
नऊ महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या
By admin | Updated: May 9, 2015 01:07 IST