शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गुरुजींच्या बदलीने भाऊक झाले गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 00:25 IST

उपक्रमशिल शिक्षण म्हणून जिल्ह्यात ओळख असलेले, राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षण जे.डी. पोटे यांची जिल्हा परिषद शाळा वायगाव येथून पोंभूर्णा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या गावात बदली झाली. यानिमित्त वायगाव येथील ग्रामस्थांनी त्यांना निरोप देत सपत्निक सत्कार केला.

ठळक मुद्देवायगाव ग्रामस्थांनी केला सत्कार : अनेकांचे अश्रू झाले अनावर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : उपक्रमशिल शिक्षण म्हणून जिल्ह्यात ओळख असलेले, राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षण जे.डी. पोटे यांची जिल्हा परिषद शाळा वायगाव येथून पोंभूर्णा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या गावात बदली झाली. यानिमित्त वायगाव येथील ग्रामस्थांनी त्यांना निरोप देत सपत्निक सत्कार केला. यावेळी ग्रामस्थ भाऊक झाले. एवढेच नाही, तर काहींना त्यांना निरोप देतांना अश्रू अनावर झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शंकर सुर्तीकर होते. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख रामराव हरडे, माजी सरपंच राखी करपते, विलास तोडासे, दुधारा शाळेचे मुख्याध्यापक देवेंद्र गिरडकर, निंबाळा शाळेचे शिक्षक राजेंद्र अनमदवार, वायगावच्या मुख्याध्यापिका अश्विनी साकरकर, शाळा व्य.स.अध्यक्ष पुरूषोत्तम पेंद्राम, बिजेंद्र सोयाम, सुर्यभान पेंद्राम, हर्षणा बागडे, दिपीका सिद्धमशेट्टीवार, सचिन पेंद्राम, लता उईके, सरू वेलादी, प्रतिभा झाडे, सरदार झाडे, मुन्नी आत्राम, सुनंदा पेंद्राम आदिंची यावेळी उपस्थिती होती. यावेळी केंद्रप्रमुख हरडे यांनी पोटे गुरुजींच्या कार्याची माहिती दिली.उपक्रमशिल तसेच नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात ते परिचित असल्याचे सांगून अगदी छोटीशी शाळा असुनही त्यांच्या काळात शाळेला जिल्हा परिषद अध्यक्ष, सिईओ, शिक्षण सभापती, डायटचे प्राचार्य आदींनी भेट दिल्याचा उल्लेख करीत विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये त्यांचे मेहनत असल्याचा उल्लेख त्यांनी याप्रसंगी केला.यावेळी अन्य मान्यवरांनीही पोटे गुरुजींबद्दल गौरोद्गार काढले. याप्रसंगी जे.डी.पोटे तसेच त्यांच्या पत्नी बोर्डा शाळेतील सहाय्यक शिक्षिका निरंजना पोटे यांचा वायगाव शाळा आणि ग्रामस्थांतर्फे शाल, श्रीफळ तसेच विठ्ठल- रुख्मीनीची मूर्ती देऊन सत्कार केला. याप्रसंगी शिक्षक पोटे यांनी ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्यामुळेच शाळेची प्रगती झाल्याचे सांगितले. तसेच सहकारी शिक्षक संघर्ष कुंभारे यांच्या कार्याचे कौतुक केले. प्रास्ताविक व संचालन सहाय्यक शिक्षक संघर्ष कुंभारे, आभार मुख्याध्यापिका साकरकर यांनी मानले. याप्रसंगी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Teacherशिक्षकTransferबदली