शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कोरपना तालुक्यात रेतीची तस्करी

By admin | Updated: January 4, 2015 23:09 IST

तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होत असताना महसूल विभाग जाणिवपूर्वक याकडे डोळेझाक करीत आहे. दररोज नदीपात्रातून अंदाजे ५० ते १०० ट्रॅक्टरद्वारे अनधिकृतपणे रेती वाहून नेली जात आहे.

कोरपना: तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होत असताना महसूल विभाग जाणिवपूर्वक याकडे डोळेझाक करीत आहे. दररोज नदीपात्रातून अंदाजे ५० ते १०० ट्रॅक्टरद्वारे अनधिकृतपणे रेती वाहून नेली जात आहे. तालुक्यातील कोडशी, परसोडा, कोडोळा येथील नदीपात्रातील रेती चांगल्या दर्जाची असल्याने या रेतीची मागणी यवतमाळ जिल्हा, आदिलाबाद-चंद्रपूर अशा तीन जिल्ह्यात आहे. त्यामुळे रेतीमाफियांचा या घाटांवर डोळा आहे. महसूल विभागाच्या डोळ्यात धूळ झोकून २४ तास नदी पात्रातील वाळूचे उत्खनन सुरू असते. महसूल विभागाच्या आर्शिवादाने रेती तस्कर चांगलेच गब्बर झाले असून आपले कोणीच करु शकत नाही. अशा आविर्भावात ते वावरत आहेत. शासनाकडून अद्याप कोणत्याही रेतीघाटाचा लिलाव झाला नाही. रेतीघाटांचा लिलाव झाल्यास अनधिकृत रेती वाहतुकीला आळा बसणार आहे. सध्या सुरू असलेल्या रेतीच्या तस्करीमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार येथे सुरू आहे. शासनाकडून रेतीघाटांच्या लिलावाला दरवर्षी विलंब होतो. त्यामुळे लाखो रुपयांची रेती लंपास केली जाते. तसे न होता लाखो रुपयांची रेती चोरी गेल्यानंतरच त्या घाटाचा लिलाव होतो. त्यामुळे शासनाचा लाखोे रुपयांचा महसूल बुडतो. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे तस्करांवर कारवाई केल्यास शासनाच्या महसुलात वाढ होऊ शकते. मात्र महसूल विभागाचे अधिकारी वैयक्तिक महसूल वाढविण्यावर भर देत आहेत. आळी-मिळी गुपचिळी, असाच एकंदर प्रकार सुरू आहे. तालुक्यातील कोडशी, वोडोळा, परसोडा, अंतरगाव, सांगोळा, भोयगाव अशा अनेक या ठिकाणाहून दररोज महसूल विभागाच्या आशीर्वादाने रेतीची खुलेआम तस्करी केली जात आहे. रेती तस्कर प्रत्येक ट्रॅक्टरमागे संबंधित अधिकाऱ्यांना ठरावीक रक्कम मिळत असल्याने हे अधिकारी या तस्करीकडे कानाडोळा करीत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. (शहर प्रतिनिधी)