शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जटपुरा गेटवरील वाहतूक कोंडी फुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 23:24 IST

जटपुरा गेट येथील वाहतूक कोंडी फोडविण्यासाठी किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आरखड्या सादर केला.

ठळक मुद्देकिशोर जोरगेवार : जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीने केली पाहणी

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : जटपुरा गेट येथील वाहतूक कोंडी फोडविण्यासाठी किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आरखड्या सादर केला. या आरखड्यावर अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी सगिती गठित केली. या समितीने जटपुरा गेट परिसराला भेट देवून पाहणी केली. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पर्यायी मार्ग निघण्याची शक्यता आहे.पाहणीदरम्यान किशोर जोरगेवार यांच्यासह जिल्हाधिकारी यांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी गठित केलेल्या समितीतील उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक, पोलीस निरीक्षक संपत चव्हाण, शहर अभियंता मनपा तसेच उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांची उपस्थिती होती. तसेच रमणिक चव्हाण, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विजय चंदावार, सदानंद खत्री, रोटरी क्लबचे अध्यक्ष अजय जयसवाल, दीपक दापके, जनचेतना जागर संस्थेचे अध्यक्ष अशोक तुमराम, विनोद गोल्लजवार यांची उपस्थिती होती.यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संपुर्ण मार्गाचे निरीक्षण केले आणि किशोर जोरगेवार यांनी सुचविलेल्या पयार्याबाबत सकारात्मक चर्चा केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, पोलीस निरीक्षक संपत चव्हाण, मनपा शहर अभियंता तसेच उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी पाहणी करून येणाऱ्या दोन दिवसात किशोर जोरगेवार यांनी सदर केलेल्या आराखड्याप्रमाणे वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यात येईल, असे उपस्थितांना सांगितले. त्यामुळे लवकरच येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.वळण मार्ग सुरू करण्याचा आराखडाजटपुरा गेटवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी किशोर जोरगेवार यांनी १ महिन्यासाठी प्रायोगिक तत्वावर वळण मार्ग सुरू करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी विविध संघटना पदाधिकाºयांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी समिती गठित केली.