शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

गोवारी समाजातर्फे पारंपरिक गोवर्धन पूजा

By admin | Updated: October 30, 2016 00:47 IST

येथून जवळच असलेल्या निंबाळा, घोट, हेटी व चालबर्डी या चार गावांच्या सीमेवर बलिप्रतिपदेला गोवर्धन पूजा करण्यात येते.

ऐतिहासिक वारसा : यात्रा व नाटकाचेही आयोजनवतन लोणे/यशवंत घुमे घोडपेठयेथून जवळच असलेल्या निंबाळा, घोट, हेटी व चालबर्डी या चार गावांच्या सीमेवर बलिप्रतिपदेला गोवर्धन पूजा करण्यात येते. या गोवर्धन पूजेला ऐतिहासिक वारसा लाभलेला असून आदिवासी गोवारी समाजातर्फे मोठ्या श्रध्देने व पारंपारिक पध्दतीने साजरी करण्यात येते.परिसरातील चपराडा, चालबर्डी, घोट, निंबाळा, हेटी, लोणारा (गोंड), लोणारा (पारखी), कचराळा, चपराडा, मानोरा, मोहबाळा व ईतर अशा जवळपास १० ते १२ गावांमधील 'गो' पाल आपल्या गायी गोवर्धन पूजेसाठी याठिकाणी घेवून येतात. सुमारे चारशे वर्षांपेक्षाही जुनी असलेली परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने परिसरातील नागरिकांकडून जोपासण्यात येत आहे.गोवर्धन पूजेच्या निमीत्ताने तालुक्यातील व्यापा-यांकडून येथे दुकाने लावली जातात. त्यामुळे परिसराला यात्रेचे स्वरूप येते. तसेच मागील काही वर्षांपासून आयोजक समितीतर्फे रात्री नागरिकांसाठी नाटकाचे आयोजनही करण्यात येते.दिपावलीच्या चौथ्या दिवशी बलिप्रतीपदेला गोवर्धन पूजेचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी सकाळी घरी गायींची पूजा केली जाते. त्यानंतर सार्वजनीक पूजेसाठी गायींना गोवर्धन पूजा पटांगणावर आणले जाते. या पटांगणावर साधारणत: पंचवीस ते तीस टोपले शेणापासुन एक मोठी भुरसी बनविण्यात येते. या भुरसीमध्ये एक अंडे व कोंबडीचे लहान जिवंत पिल्लू ठेवण्यात येते. पिलाचे धड शेणामध्ये दाबलेले असते व मानेचा भाग खुला ठेवण्यात येतो. तसेच अंदाजे एक फुटाच्या अकरा काड्यांचे अंडे व पिल्लाच्या सभोवती कुंपण करण्यात येते. या काड्या पाच प्रकारच्या झाडांच्या असतात. यावर गुलाबी रंगाची रिबीन गुंडाळून नारळाने भुरसीची ओटी भरण्यात येते. यावेळी लाकडी ढालींचे पूजन करण्यात येते. यानंतर गोवर्धन पुजेला सुरूवात होते. पूर्वी चारही गावांच्या सीमेची व शिवारामध्ये असलेल्या देवांची पूजा करण्यात येते. या पूजेला 'शिव बांधणे' असे म्हणतात. त्यानंतर पटांगणाशेजारी असलेल्या वाघोबाच्या मुतीर्ची व श्रीकृष्णाची पूजा करण्यात येते. पवित्र मंत्र म्हणून व नारळ फोडून भुरसीची पुजा करण्यात येते. नंतर पिल्लू व अंडे भुरसीबाहेर काढण्यात येते.गुरांना वन्यप्राण्यांपासून त्रास होवू नये, गुरे रानात हरवू नयेत, गुरांना जादूटोणा होवू नये, त्यांचे रक्षण व्हावे, गुरांवर कोणतेही संकट येवू नये म्हणून फार पूवीर्पासून गायगोदन व पूजा करून देवाला प्रसन्न करतात. पूजा करतांना गायगोदनात कोंबडीचे पिल्लू व अंडे ठेवतात. त्यावर गायी खेळवितात. गायी खेळवितांना अंडे व पिल्लू यांना इजा झाली नाही व दोन्ही सुरक्षित राहिले तर गायगोदन साधला असे समजले जाते.गोवारी समाजाचे आणि गोवर्धन पूजेचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी दरवर्षी बलिप्रतिपदेला या ऐतिहासीक पूजेचे आयोजन करण्यात येते. आपल्या पुर्वजांनीही गायीला मातेचा दर्जा दिला आहे. दरवर्षी आदिवासी गोवारी समाज गोमातेची मनोभावे पूजा करतो. सध्याच्या वेगवान युगात आपल्या जुन्या रूढी व परंपरा हरवत चालल्या आहेत. त्या परंपरा जपणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.- दिलीप राऊतअध्यक्ष, आदिवासी गोवारी समाज