शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या बांधापर्यंत जाणार ट्रॅक्टर, अनेक रस्त्यांना मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 12:37 IST

मातोश्री पाणंद रस्ते योजना : काही कामे खोळंबली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गावातील रस्ते हे सुस्थितीत असतील तर गावाचा विकास साधला जातो. त्याचबरोबर शेतीकडे जाणारे रस्तेही सुस्थितीत असतील तर शेतीतून अर्थकारणाला चालना मिळते. मातोश्री पाणंद योजनेंतर्गत शेतावर जाणाऱ्या रस्त्यांना मंजुरी दिली जाते. त्यामुळे शेतीसाठी लागणारी यंत्रसामुग्री पक्का रस्ता असल्यास शेतावर नेण्यास सोयीचे होते.

जिल्ह्यात अनेक गावांतील पाणंद रस्ते मंजूर झाले असून काहींचे काम सुरू झाले आहे. तर काही रस्त्यांची कामे खोळंबली आहेत. पाणंद रस्ते झाले तर पारंपरिक शेतीमुळे करावी लागणारी मेहनत कमी होईल तसेच शेतीची कामे वेळेत होतील याचा फायदा बळीराजाला होणार आहे. मात्र ही योजना राबविताना ग्रामीण भागात काही अडचणींचाही सामना करावा लागत आहे.

काय आहे मातोश्री पाणंद योजना?

  • यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये बहुसंख्य कामे यंत्रामार्फत करण्यात येत असल्याने या यंत्रसामग्रीची वाहतूक करण्याकरिता बारमाही वापराकरिता शेत, पाणंद रस्ते सुयोग्य असणे गरजेचे आहे.
  • त्याचाच एक भाग म्हणून प्रमाणित दर्जाचे शेत पाणंद रस्ते तयार करण्याकरिता मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना राबविण्यात येत आहे.

यंत्र नेणे होते अवघड

  • शेताकडे जाणारे रस्ते हे पायवाट किंवा कच्चे असतात. त्यामुळे शेतात यंत्र घेऊन जाणे किवा शेतमाल नेणे आणणे अवघड जाते. यासाठी शासनाने मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ता योजना राबवली आहे. या योजनेंतर्गत अनेक रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे.

शेत रस्त्यांचे भाग्य उजाळणार

  • जिल्ह्यात पंधरा तालुके आहेत. या तालुक्यातील काही गावांत आजही पाणंद रस्ते नसल्याने नागरिकांना चिखलातून शेतात जावे लागते. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून पाणंद रस्त्यांचे भाग्य उजाळणार आहे.

नागरिकांचा विरोध

  • काही रस्त्याने प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे; मात्र शेताकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला परिसरातील नागरिकांची मंजुरी मिळत नसल्याचेही काही गावांत चित्र आहे.
  • रस्त्याचे काम पूर्ण करण्यात अडचणी येत असल्याची माहिती मिळाली आहे. शेतातील रस्ता देण्यास काही शेतकरी अडवणूक करीत असल्याने रस्ता मंजूर होऊनही काम सुरु झाले नसल्याची स्थिती आहे.
  • काही रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी अडली आहे.
टॅग्स :road transportरस्ते वाहतूकfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रchandrapur-acचंद्रपूर