शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रिक सिमेंट पोल भरलेला ट्रॅक्टर उलटला; दोघांचा मृत्यू, एक गंभीर

By साईनाथ कुचनकार | Updated: May 19, 2023 17:12 IST

अपघातस्थळी पोहोचलेल्या ठेकेदाराला हृदयविकाराचा तीव्र झटका : पिपरी दीक्षित गावाजवळची घटना

चंद्रपूर:  पोंभूर्णा  तालुक्यातील चेक घोसरी येथून चेक बेंबाळ या गावाला ट्रॅक्टरने इलेक्ट्रिक सिमेंट पोल नेत असताना पिपरी दीक्षित गावाजवळ ट्रॅक्टर ट्राली उलटली. या अपघातात दोन मजुुरांचा मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला. दरम्यान, ट्रॅक्टरच्या मागे दुचाकीने येत असलेल्या ठेकेदाराने अपघात बघताच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ही घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. अपघातात मिथुन पांडुरंग मराठे (३५), अंकित राजू गंद्देशिवार (३०, दोघेही रा.केळझर) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर ईश्वर मंडरे (३४) गंभीर जखमी झाले. हृदयविकाराचा झटका आलेले ठेकेदार सुभाष रणदिवे (४४) या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चेक बेंबाळ गावात इलेक्ट्रिक सिमेंट पोलचे काम करण्याकरिता चेक घोसरी येथून ट्रॅक्टरच्या साहाय्याने सहा सिमेंटचे पोल नेण्यात येत होते. या ट्रॅक्टरमध्ये पाच मजूर तसेच चालक बसून होते. पिपरी दीक्षित गावाजवळ चेक बेंबाळ रोडवर ट्रॅक्टर ट्राली उलटली. यामध्ये सिमेंट पोल मजुरांच्या अंगावर पडले. या घटनेमध्ये मिथुन पांडुरंग मराठे (३५), अंकित राजू गंद्देशिवार (३०) दोघेही रा. केळझर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर ईश्वर मंडरे (३४, रा. केळझर) हा गंभीर जखमी झाला. दरम्यान, ट्रॅक्टरच्या मागे दुचाकीने येत असलेले ठेकेदार सुभाष रणदिवे (४४, रा. केळझर) अपघातस्थळी पोहोचताच अपघात बघून त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. या दोघांना तात्काळ पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तात्काळ चंद्रपूरला हलविण्यात आले, तर ट्रॅक्टरचालक आशिष निकोडे, विनोद मराठे, गुरुदास सातरे हे किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांना पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Accidentअपघात