शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मोबदल्याविना उभारताहेत टॉवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:02 IST

ऑनलाईन लोकमतगेवरा : सावली पॉवर ग्रीड कंपनीने सावली तालुक्यातील शेतकºयांच्या शेतातून विनापरवाना टॉवर उभारणीचे काम सुरू केल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.पॉवर ग्रीड कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतात टॉवर उभारताना परवानगी घेतली नाही. जमीन व उभ्या पिकांचा मोबदला न देता केवळ कामचलाऊ संमती पत्राच्या आधारे शेतकऱ्यांना अंधारात ठेवले. त्यानंतर कंत्राटदारांची नियुक्ती ...

ठळक मुद्देपॉवर ग्रीडचा प्रताप : शेतकºयांमध्ये तीव्र संताप

ऑनलाईन लोकमतगेवरा : सावली पॉवर ग्रीड कंपनीने सावली तालुक्यातील शेतकºयांच्या शेतातून विनापरवाना टॉवर उभारणीचे काम सुरू केल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.पॉवर ग्रीड कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतात टॉवर उभारताना परवानगी घेतली नाही. जमीन व उभ्या पिकांचा मोबदला न देता केवळ कामचलाऊ संमती पत्राच्या आधारे शेतकऱ्यांना अंधारात ठेवले. त्यानंतर कंत्राटदारांची नियुक्ती करून टॉवर उभारणीचे काम सुरू केल्याने शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. पण, अन्यायग्रस्त शेतकºयांच्या पाठीशी कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांकडून हालचाल सुरू न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शासकीय प्राधिकरण किंवा खासगी कंपणीद्वारे प्रकल्प उभारायचा असेल तर शेती उपयोगाच्या स्थानिक ग्रामसभांची अनुमती घेणे पंचायत राज कायद्यानुसार बंधनकारक आहे. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांसोबत सरळ वाटाघाटीने रेडिरेक्नर अथवा त्या परिसरातील जमिनीच्या शेवटच्या जमीन खरेदी विक्री व्यवहाराच्या किंमतीनुसार जमिनीच्या मोबदल्याचे दर ठरविले जातात. आवश्यक जमीन अधिग्रहण प्रक्रिया महाराष्ट्र जमीन अधिग्रहण कायद्यानुसार करणे बंधनकारक आहे. मात्र, प्रकारची कायदेशिर प्रक्रिया पूर्ण न करता पॉवर ग्रीड कंपनीने खासगी कंत्राटदारांपर्यंत शेतकऱ्यांची दिशाभूल करून उभ्या पिकांत टॉवर उभारणीचे काम करीत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मोबदल्याशिवाय शेत जमिनीत पोकलॅन्ड जेसीबी मशीन लावून खोदकाम करण्याचा प्रकार सुरूच असल्यसचे दिसून येते. निफंद्रा शेतशिवारात सुरू असलेल्या टॉवर बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराकडे चौकशी केली असता केवळ संबंधित पत्र घेवून शेतकऱ्यांच्या शेत जमिनीत टॉवरचे काम सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. मोबदल्यासंदर्भात विचारणा केली असता केंद्र सरकार शेतकऱ्यांना मोबदला देईल, अशी मोघम उत्तरे शेतकऱ्यांना दिली जात आहेत.सावली तालुक्यातील करोली, आकापूर, खानाबाद, गेवरा बुज. गेवरा खुर्द, विहिरगाव, डोंगरगाव, निफंद्रा, अंतरगाव, निमगाव, दाबगाव, व्याहाड खुर्द आणि अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत बळजबरीने नियमबाह्य टॉवर उभारण्यात आली आहेत. हा प्रकार जोमाने सुरू असल्याने तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि विविध संघटनांनी पॉवर ग्रीड कंपनीच्या मनमानीविरुद्ध आवाज उठवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.