शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

झाडावर चढून अस्वल चाखते मधाचा आस्वाद !

By admin | Updated: November 17, 2014 22:49 IST

भटाळी कोळसा खाणीच्या उपक्षेत्रीय प्रबंधक कार्यालयातील प्रांगणात असलेल्या एका झाडावर चढुन एक अस्वल रोज मधमाशाच्या पोळ्यातील मध चाखत असल्याचा नित्यक्रम सुरू आहे.

दुर्गापूर : भटाळी कोळसा खाणीच्या उपक्षेत्रीय प्रबंधक कार्यालयातील प्रांगणात असलेल्या एका झाडावर चढुन एक अस्वल रोज मधमाशाच्या पोळ्यातील मध चाखत असल्याचा नित्यक्रम सुरू आहे. हा चित्तथरारक प्रकार न्याहळता येत नसला तरी झाडावर असलेल्या तीक्ष्ण नखाच्या पाऊलखुणा बघून थरकाप उडतो.भटाळी कोळसा खाणीच्या उपक्षेत्रीय प्रबंधक कार्यालयाच्या प्रांगणात एक मोठे झाड आहे. या झाडाच्या उंच टोकावर मधमाशांचे पोळे आहेत. अनेक वर्षांपासून मधमाशांनी आपले या झाडावर आपले बस्तान मांडले आहे. या पोळ्यावर जंगलातून भटकत आलेल्या एका अस्वलाची नजर पडली. ही अस्वल गत तीन-चार महिन्यांपासून मध चाखण्याच्या प्रयत्नात आहे. मधमाशाचे पोळे झाडाच्या १५ ते २० फुट उंच बारीक फांद्यावर असल्याने ती त्यांच्यापर्यंत पोहचु शकत नव्हती. असाच रोज रात्री तिचा नित्यक्रम सुरू होता. सकाळी कार्यालयात आलेले कर्मचारी अस्वलाच्या झाडावर चढतानाच्या तीक्ष्ण नखाच्या उमटलेल्या पाउलखुणा बघून चकीत व्हायचे. असाच अस्वलाचा रोजचा नित्यक्रम सुरु आहे. आता ती चक्क बारीक फाद्यांवर जावून मधमाशाच्या पोळ्यातील मधाचा मनसोक्तपणे आस्वाद लुटत आहे. ती दररोज रात्री एक एक पोळे फस्त करीत असून एवढे असूनही मधमाशा वृक्ष सोडून इतरत्र हलायचा तयार नाही. त्यामुळे या अस्वलाचीही रोज रात्री येथे चांगली मेजवनी होत आहे. वृक्षाच्या बुंध्यावर सभोवताल तिक्ष्ण नखाच्या खुणा उमटल्या आहेत. या झाडावर रोज नव्या नव्या खुणा येथे अनुभवास मिळत असून हे थरकाप उडविणारे दृष्य रात्री कोणालाही न्याहाळता येत नाही. मात्र या झाडावर उमटलेल्या खुणा बघायला वसाहतीतील नागरिका येतात. (वार्ताहर)