शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

खडकीजवळ पर्यटकांचा ट्रॅक्टर उलटला

By admin | Updated: January 9, 2017 00:34 IST

सहलीसाठी घोडाझरी येथे आलेल्या आणि एक मौज म्हणून ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या महिलांचा ट्रॅक्टर अचानक उलटला.

३८ महिला जखमी : १० महिलांची प्रकृती चिंताजनकनागभीड : सहलीसाठी घोडाझरी येथे आलेल्या आणि एक मौज म्हणून ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या महिलांचा ट्रॅक्टर अचानक उलटला. या घटनेत ३८ महिला जखमी झाल्या. यातील १० महिलांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे. घोडाझरी जवळील खडकी येथे दुपारी ३ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.या अपघातातील जखमी महिला या नागपूर येथील रहिवासी असल्याचे समजते. नागपूर येथील या महिला एका ट्रॅव्हल्सने घोडाझरी येथे पर्यटनासाठी आल्या होत्या. ट्रॅव्हल्स पुढे जात नसल्याने खडकी येथे ट्रॅव्हल्स सोडून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या घोडाझरी येथे या महिला पायदळ चालत गेल्या. दिवसभर मौजमजा करुन व पर्यटनाचा आस्वाद घेऊन परतीच्या प्रवासाठी परत पायीच ट्रॅव्हल्सकडे निघाल्या. या दरम्यान, वाटेत त्यांना एक ट्रॅक्टर खडकीकडे जाताना दिसले. त्यांना ट्रॅक़्टरमध्ये बसायची इच्छा झाली. त्यांनी ट्रॅक्टर चालकाशी बोलून भाडेही ठरवले व त्या खडकीकडे निघाल्या.दरम्यान, एका वळणावर काही कळायच्या आत ट्रॅक्टरवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर अचानक उलटले. यात ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या सर्वच महिला जखमी झाल्या. यातील १० महिलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. जखमीमध्ये मेघा अरविंद कहाटे (४०), सुनंदा सुखदेव सरोदे (४०), अर्चना मिलिंद गिरजे (३५), कल्पना रमेश खडसे (४८), सुप्रिया मनिष शहा (४०), अश्विनी अमोल कदम (३५), ज्योती अतुल पुजारी (४०), पूजा पंकज भुजबळ (४०), मिनाक्षी प्रशांत कोलाखरे (३९), अपर्णा चंद्रशेखर शास्त्री (३५), शर्वरी राजुरकर (४५), आरती प्रशांत सदावर्ती (३०), वनमाला वसंत मेश्राम (४५), अनिता निगडे (४०), प्रगती संजय पाठक (४७), आशा दीपक धगमवार (४४), केतकी प्रद्यूमन चावजी (४५), चंदा शिर्ष दारव्हेकर (६०), दर्शना आनंद नाईक (४०), अनुराधा अशोक देशपांडे ६०), कविता गिरीष धाडसे (३०), वर्षा विनोद ढोमणे (३५), अलका सुधाकर चोवळे (४०), अरुणा विजय संघणे (६०), हर्षा हरिश वाघमारे (५७), निलीमा विवेक पांडे (३०), वृंदा संजू तारे (४०), मेघा तारे (४५), आदिती अभय मानके (३५), पल्लवी जयंत खोले (४०), विना राम पुसदकर (४०), छाया शेखर पारधी (४९) आणि जया अरविंद देशमुख यांचा समावेश आहे. मिळेल त्या वाहनाने या सर्व जखमींनी नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)