शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात १ जुलैपासून पर्यटन सफारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 11:55 IST

आता १ जुलै २०२० पासून ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनासाठी केवळ बफर क्षेत्र सुरू करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक अटी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० पासून ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटन बंद करण्यात आला होता. राज्याचे मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या आदेशानुसार आता १ जुलै २०२० पासून व्याघ्र प्रकल्पाच्या केवळ बफर क्षेत्रात पर्यटन सुरू करण्यात येणार आहे. कोरोनामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून काही नियम ठरविण्यात असून पर्यटकांनी काटेकोरपणे अंमलबजावणी, असे आवाहन ताडोबाचे क्षेत्र संचालक एन. आर. प्रवीण यांनी केले.ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनासाठी आरक्षण हे ऑफलाईन राहणार आहे. त्यासाठी संबंधित प्रवेशद्वारावर जो प्रथम येणार त्यालाच आरक्षण मिळेल. पर्यटनाची वेळ सकाळी ६.३० ते सकाळी १० आणि दुपारी २ ते सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत अशी राहणार आहे. त्यासाठी प्रत्येक फेरीचे जिप्सी शुल्क मार्गदर्शन शुल्क, कॅमेराचे शुल्क निश्चित करण्यात आले. प्रत्येक बफर प्रवेशद्वारातून एका फेरीत केवळ ६ जिप्सी वाहनांनाच प्रवेश देण्यात येईल. प्रवेश देण्यात येणाऱ्या ६ वाहन व पर्यटक मार्गदर्शकांपैकी ४ वाहने व मार्गदर्शन संबंधित बफर प्रवेशद्वारावर नोंदणी झाली असेल तर उर्वरित २ वाहने व मार्गदर्शक नजिकच्या कोअर प्रवेश द्वारावरील नोंदणीकृत असतील. पर्यटन वाहनात बसण्यापूर्वी पर्यटकांनी सॅनिटायझरने हात निर्जंतुक करावे. याशिवाय कोणत्याही पर्यटकाला जिप्सीमध्ये बसू दिले जाणार नाही. सॅनिटायझर आणण्याची जबाबदारी पर्यटकांची आहे. मास्क लावणाऱ्या पर्यटकांनाच व्याघ्र प्रकल्पात प्रवेश देण्यात येईल, अशी माहिती क्षेत्र संचालक एन. आर. प्रवीण यांनी ‘लोकमत’ दिली.सहा प्रवेशद्वारातून मिळणार प्रवेशताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात पर्यटन करण्यासाठी मोहुर्ली- देवाडा-अडेगाव-आगझरी, खुटवंडा- जुनोना, नवेगाव-रामदेगी-अलीझंजा-निमडेला, कोलारा-मदनापूर, सिरखेडा, पांगडी आणि झरी-पेठ केसलाघाट आदी सहा प्रवेशद्वारातून पर्यटकांना प्रवेश देण्यात येणार आहे.

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पTigerवाघ