शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सिंदेवाहीत पट्टेदार वाघाचे भ्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 23:07 IST

सिंदेवाही वनपरिक्षेत्रात मागील आठ महिन्यांपासून पट्टेदार वाघांचा मुक्तसंचार सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी किन्ही - मूरमाडी जंगलात एका वाघाला बेशुद्ध करुन जेरबंद करण्यात आले. अशातच मंगळवारी कारगाटा-कच्चेपार जंगलालगत दोघांना पुन्हा पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. त्यांनी या वाघाचे छायाचित्रही काढले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये दहशत कायम : दोघांना पुन्हा वाघाचे दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : सिंदेवाही वनपरिक्षेत्रात मागील आठ महिन्यांपासून पट्टेदार वाघांचा मुक्तसंचार सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी किन्ही - मूरमाडी जंगलात एका वाघाला बेशुद्ध करुन जेरबंद करण्यात आले. अशातच मंगळवारी कारगाटा-कच्चेपार जंगलालगत दोघांना पुन्हा पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. त्यांनी या वाघाचे छायाचित्रही काढले.प्रा. डॉ. बागलवाडे आणि प्रा. डॉ. बेदरे हे मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास ब्रह्मपुरीवरुन सिंदेवाहीकडे येत होते. दरम्यान, कारगाटा-कच्चेपार जंगलालगतच्या रस्त्याच्या बाजुला त्यांना एक पट्टेदार वाघ जाताना दिसला. पंधरा मिनिटे त्यांनी तिथेच राहून वाघाचे दर्शन घेतले. छायाचित्रही काढले. यासोबतच मंगळवारच्याच रात्री ९ वाजता सिंदेवाही येथील पाण्याच्या टाकीजवळ बिबट्याचे नागरिकांना दर्शन झाले. सिंदवाही तालुक्यात चारही बाजूने वाघ, बिबट यांचा मुक्तसंचार आजही सुरुच असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. चार जणांचा बळी घेणाऱ्या वाघाला वनविभागाने जेरबंद केले असले तरी तालुक्यात वाघ व बिबट फिरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.जाटलापूर, गडमौशी, चारगाव, डोंगरगाव, भेंडाळा, लाडबोरी परिसरात वाघाची दहशत आहे. सिंदेवाही वनपरिक्षेत्रातच सात पट्टेदार वाघ, तीन बिबट असल्याचे वनविभागाचे अधिकारी सांगत आहेत. कच्चेपार जंगलात वाघ असल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. दरम्यान, वनपरिक्षेत्रअधिकारी अरुण गोंड, क्षेत्रसहाय्यक जी.आर. करंडे यांनी कुठे वाघ दिसला तर तत्काळ वनविभागाला कळवावे, असे आवाहन केले आहे.मागील एक महिन्यापासून किन्ही-मूरमाडी परिसरातील वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी शासनाने ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील एसआयटीपीचे २० कर्मचारी तथा दंगा पथक मूरमाडी परिसरात तैनात केले होते. वाघ पकडण्यासाठी लाखो रुपये खर्च केले. हा वाघ जेरबंद झाला. मात्र आणखी दुसरे वाघ परिसरात येत असल्याने नागरिक पुन्हा दहशतीत आहेत.