शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

आसामनंतर आता पोंभुर्णा येथे टूथपिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 23:23 IST

आजपर्यंत टूथपिक तायवानहून आयात व्हायची. पण आता आसामनंतर फक्त पोंभुर्णा येथे टूथपिक तयार होणार आहे. पोंभुर्णा येथे तयार होणाऱ्या टूथपिक या पुढील काळात आपण पंच तारांकित हॉटेल्सला पुरवू शकतो. आदिवासीबहुल असलेल्या पोंभुर्णा तालुक्यात टूथपिक उत्पादन प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचे नवे दालन तयार होत आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : पोंभुर्णा येथे टूथपिक उत्पादन केंद्राचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आजपर्यंत टूथपिक तायवानहून आयात व्हायची. पण आता आसामनंतर फक्त पोंभुर्णा येथे टूथपिक तयार होणार आहे. पोंभुर्णा येथे तयार होणाऱ्या टूथपिक या पुढील काळात आपण पंच तारांकित हॉटेल्सला पुरवू शकतो. आदिवासीबहुल असलेल्या पोंभुर्णा तालुक्यात टूथपिक उत्पादन प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचे नवे दालन तयार होत आहे. पोंभुर्णा तालुक्यात विकासकामांसह रोजगार निर्मितीच्या दृष्टीने अनेक प्रकल्प आपण राबवित आहोत. मी विकास करतो, तुम्ही सहकार्य करा, असे आवाहन अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.पोंभुर्णा येथे आयोजित टूथपिक उत्पादन केंद्र तसेच बांबु हॅन्डीक्राफ्ट अ‍ॅन्ड आर्ट युनिटच्या लोकार्पण सोहळयाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, पंचायत समिती पोंभुर्णाच्या सभापती अलका आत्राम, पोंभुर्णा येथील नगराध्यक्ष श्वेता बनकर, पोंभुर्णा तालुका भाजपाचे अध्यक्ष गजानन गोरंटीवार, नगरसेवक अजित मंगळगिरीवार, महाराष्ट्र बांबु विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक टी.एस.के. रेड्डी, चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक एस.व्ही. रामाराव, बांबु प्रशिक्षण व संशोधन केंद्राचे संचालक राहुल पाटील, मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, पोंभुर्णा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी विपिन मुद्दा आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.यावेळी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, पोंभुर्णा तालुक्यातील नागरिकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. त्यामुळे त्यांच्या विकासाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवावे, असे मला मनापासून वाटते. त्यादृष्टीने वाटचाल करीत आहोत. जंगल हे शाप की वरदान असा प्रश्न नेहमी उपस्थित केला जातो, पण जंगल आपल्यासाठी नेहमीच वरदान ठरले आहे. जंगलाच्या माध्यमातून रोजगाराच्या वाटा आपल्याला गवसल्या आहे. पण केवळ रोजगारच नको तर देशभक्तीची भावना सुध्दा जागविण्याची आवश्यकता आहे. पोंभुर्णा तालुक्यातील आदिवासी महिलांची पोल्ट्री प्रोडयुसर्स कंपनी ही महाराष्ट्रातील पहिली आदिवासी महिलांची संस्था ठरली आहे. टाटा ट्रस्टच्या सहकार्याने शंभर गावांमध्ये समृध्द शेतीचा प्रयोग आपण करीत आहेत. या मतदार संघातील अंगणवाडया आयएसओ प्रमाणित आदर्श करण्याची योजना आपण आखली आहे. पुढील सहा महिन्यात या मतदार संघात शंभर टक्के गावांमध्ये आरओ मशीन बसवून नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी आपण पुरविणार आहोत, असे ना. मुनगंटीवार म्हणाले.प्रास्ताविकात बिआरटीसीचे संचालक राहुल पाटील म्हणाले, कॉमन फॅसीलिटी सेंटरमधून दोनशे तर टुथपिक प्रकल्पातून ६० ते ७० व्यक्तींना रोजगार मिळणार आहे. यातील वस्तू खरेदी करण्यासाठी थिंकफू कंपनीने तयारी दर्शविली आहे. अन्य मोठ्या कंपन्याही बांबूपासून तयार केलेल्या वस्तू खरेदीसाठी पुढे सरसावल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांचेही भाषण झाले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.स्वतंत्र एमआयडीसीला मान्यतापोंभुर्णा तालुक्यासाठी स्वतंत्र एमआयडीसी स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. ग्रामीण रूग्णालयाच्या माध्यमातून उत्तम आरोग्य सेवा आपण या भागातील नागरिकांना पुरविणार आहोत. पोंभुर्णा येथे ग्रामीण रूग्णालय मंजूर झाल्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उमरी पोतदार येथे स्थानांतरीत करण्याचा निर्णयसुध्दा झालेला आहे. विकासाची ही प्रक्रिया अधिक गतीमान करण्याचा आपला मानस आहे, असे ना. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.