लोकमत न्यूज नेटवर्कआक्सापूर : चंद्रपूर -अहेरी राष्ट्रीय महामार्गावरील गोंडपीपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा बसस्थानाकाजवळ टमाटरने भरलेला ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने उलटला. सुदैवाने यात जिवित हानी झाली नाही. सदर घटना गुरुवारी रात्री ३ वाजताच्या सुमारास घडली.घटनेनंतर त्या ठिकाणी टमाटरचा जणू सडाच पसरला. ही घटना रात्री घडल्याने अनेकांना याबाबत माहिती झाले नाही. मात्र पहाटेच्या सुमारास नागरिकांना घटनेची माहिती मिळाली. घटनास्थळी टमाटर पडून असल्याने नागरिकांनी घटनास्थळावर एकच गर्दी केली.नेता येईल तेवढे टमाटर नागरिकांनी घरी घेऊन गेले. अखेर पोलिसांना पाचारण करून सदर प्रकार थांबविण्यात आला. पोलिसांनी ट्रकला बाजुला केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरु झाली.
टमाटरने भरलेला ट्रक उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 22:47 IST