शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

अर्थसंपन्न महिला निर्माण झाल्यानंतरच आजची महिला अत्याचारमुक्त होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 00:34 IST

राज्य महिला आयोगाचे काम या अत्याचारपीडित महिलांना न्यायिक मदत करणे, हेच नसून जोपर्यंत महिलांमध्ये अर्थसंपन्नता येणार नाही. तोपर्यंत महिला अत्याचार मुक्त होणार नाही. म्हणून राज्य शासनाच्या मदतीने राज्य महिला आयोगाने प्रज्वला योजना सुरू केली आहे.

ठळक मुद्देविजया रहाटकर : जिल्ह्यातील महिलांकरिता प्रज्वला योजनेअंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महिलांवरील अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्य महिला आयोगाचे काम या अत्याचारपीडित महिलांना न्यायिक मदत करणे, हेच नसून जोपर्यंत महिलांमध्ये अर्थसंपन्नता येणार नाही. तोपर्यंत महिला अत्याचार मुक्त होणार नाही. म्हणून राज्य शासनाच्या मदतीने राज्य महिला आयोगाने प्रज्वला योजना सुरू केली आहे. या माध्यमातून महिला अर्थसंपन्न होतील, असा दृढ विश्वास आहे, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी केले. प्रज्वला योजनेअंतर्गत येथील प्रियदर्शिनी सभागृहात महिला बचत गटांच्या सदस्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.यावेळी महिला आयोगाच्या सदस्य वनिता कानडे, प्रज्वला योजनेच्या अध्यक्ष दीपाली मोकाशी, समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, कृषी सभापती अर्चना जीवतोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पचारे, जिल्हा समन्वयक वनिता घुमे, महिला विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक नरेश उगेमुगे, राहुल ठाकरे, मार्गदर्शिका रेखा कोठेकर, पंचायत समिती सदस्य विकास जुमनाके, गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर सपाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके प्रमुख्याने मंचावर उपस्थित होते.यावेळी त्यांनी राज्य शासन तसेच केंद्र शासनाच्या महिलांसाठी असलेल्या विविध योजना उपस्थित महिलांना समजून सांगितल्या. तसेच महिलांच्या संरक्षणासाठी तसेच विकासासाठी राज्य शासन तसेच केंद्र शासनाने तयार केलेल्या कायद्याविषयी सखोल माहिती दिली. या कार्यक्रमात प्रत्येक महिलांना एक कीट देण्यात आली.त्यामध्ये योजना तसेच कायदे याविषयी माहिती देणाऱ्या पुस्तिकांचा समावेश होता. त्या पुस्तिकांचा महिलांनी जाणीवपूर्वक अभ्यास करावा, तसेच कुठेही महिलांवर अत्याचार झाला तरी राज्य महिला आयोग प्रत्येक महिलेच्या पाठीशी उभे असून पीडित महिलेने भीतीमुक्त होऊन स्थानिक यंत्रणेकडे दाद मागण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन रहाटकर यांनी यावेळी केले. याप्रसंगी राज्याचे वित्त, नियोजन, विशेष सहाय्य, वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी व्हिडिओ कान्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाला उपस्थित महिलांशी जवळपास दहा मिनिटे संवाद साधला.काय आहे प्रज्वला योजना?राज्यामध्ये सुमारे पाच लाख बचत गट कार्यरत असून त्यांच्याशी सुमारे एक कोटी दहा लाख महिला जोडलेल्या आहेत. बचत गट आर्थिक सक्षमीकरणाच्या कणा असल्याने आयोगाने बचत गटांना आणखी सक्षम करण्यावर भर दिला आहे. त्यातून प्रज्वला योजना आकारास आली आहे. प्रज्वला योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात महिला बचत गटातील महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात एक जिल्हा एक वस्तू अशी क्लस्टर तयार करण्यात येणार आहे. त्यातून प्रत्येक जिल्ह्याला एक ओळख आणि महिलांना मोठया प्रमाणात रोजगार मिळेल. तिसऱ्या टप्प्यात बचत गटांच्या उत्पादनांना शाश्वत बाजारपेठ मिळवण्यासाठी बचत गट बाजार जिल्ह्याच्या ठिकाणी उभारण्याचे नियोजन आहे, अशा पद्धतीने प्रज्वला योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

टॅग्स :Womenमहिला