शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘१० वी नंतर पुढे काय’ यावर आज मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 23:24 IST

लोकमत बाल विकास मंच व चाणक्य कौन्सिलिंग सेंटरच्या वतीने ‘१० वी नंतर पुढे काय?’ या विषयावर शुक्रवारी दि. ३० सकाळी १०. ३० वाजता स्थानिक बसस्थानकाजवळील हॉटेल सिद्धार्थ प्रिमिअर येथे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देलोकमत बाल विकास मंच व चाणक्य कौन्सिलिंग सेंटरचा उपक्रम

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : लोकमत बाल विकास मंच व चाणक्य कौन्सिलिंग सेंटरच्या वतीने ‘१० वी नंतर पुढे काय?’ या विषयावर शुक्रवारी दि. ३० सकाळी १०. ३० वाजता स्थानिक बसस्थानकाजवळील हॉटेल सिद्धार्थ प्रिमिअर येथे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. प्रसिद्ध करियर कौन्सिलर व मोटीव्हेशनल स्पिकर अग्रवाल स्टडी सेंटर आणि चाणक्य कौन्सिलिंग सेंटरचे संचालक जगदिश अग्रवाल, नो युवर टॅलेंट अकादमीचे संचालक डॉ. रश्मी शुक्ला आदी मार्गदर्शन करणार आहेत.या कार्यक्रमात वर्ग ९ ते १२ वीचे विद्यार्थी व पालक नि:शुल्क सहभागी होवू शकतात. सर्वप्रथम २०० विद्यार्थी पालक व सखी मंच सदस्यांना प्राधान्य देण्यात येईल. नुकतीच दहावीची परीक्षा झाली़ पुढे काय शिकावे,या विवंचनेत विद्यार्थी आहेत. दहावीनंतर विविध क्षेत्र त्यांना आकर्षित करत आहेत. भविष्याला कलाटणी देणारे हे वर्ष अतिशय महत्त्वाचे आहे. निर्णय घेताना विद्यार्थीच नव्हे तर पालकही गोंधळून जाण्याची शक्यता आहे. त्यातही डॉक्टर व अभियंता होण्यासाठी अभ्यासक्रम निवडणे, शिकवणी कोणती घ्यायची, महाविद्यालयाची निवड कशी करावी? आदी प्रश्न विद्यार्थी व पालकांना अस्वस्थ करीत आहेत. या प्रश्नांची उत्तरे या शिबिरात विद्यार्थी आणि पालकांना मिळणार आहेत. व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी आणि करियर संदर्भातील हे प्रशिक्षण पे्ररणादायी ठरणार आहे. भविष्याची वाटचाल समृद्ध करण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी हे प्रशिक्षण कदापि चुकवू नये, असा हा उपक्रम शहरात आयोजित करण्यात आला आहे़यावेळी पालक व विद्यार्थ्यांना पडणाऱ्या विविध प्रश्नांची उत्तरे जगदिश अग्रवाल देणार आहेत. शिबिरामध्ये विद्यार्थी आणि पालकांना नि:शुल्क प्रवेश देण्यात येणार आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी उपक्रम प्रमुख अमोल कडूकर ९२७०१३१५८०, ७९७२६११२४३, सखी जिल्हा संयोजिका सोनम मडावी ९९७५६६६३५५ यांच्याशी संपर्क साधावा.सर्व प्रश्नांची हमखास उत्तरेशिक्षण क्षेत्रात प्रचंड स्पर्धा वाढल्याने विद्यार्थी मानसिकदृष्ट्या तणावात आहेत. करिअर कसे घडवावे, यासाठी विविध प्रश्नांनी त्यांचे मन अस्वस्थ झाले. या सर्व प्रश्नांची शास्त्रशुद्ध उत्तरे या कार्यक्रम विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.