शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आज चोख बंदोबस्त, ५०० पोलीस तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 23:15 IST

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या निवडणुकीचा निकाल गुरुवारी एमआयडीसी दाताळा परिसरातील वखार महामंडळाच्या गोदामामध्ये होणार आहे. निकालादरम्यान कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून चंद्रपूर पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.

ठळक मुद्देसीआरपीएफ दलाच्या विशेष तुकड्या एक महिन्यांपासून मतमोजणी केंद्र परिसरात डोळ्यात तेल टाकून

चंद्रपूर : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या निवडणुकीचा निकाल गुरुवारी एमआयडीसी दाताळा परिसरातील वखार महामंडळाच्या गोदामामध्ये होणार आहे. निकालादरम्यान कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून चंद्रपूर पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात ५०० पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.चंद्रपूर लोकसभा क्षेत्र संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखले जाते. तसेच या क्षेत्रात स्थानिक राजकीय नेते मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील निवडणूक ही अत्यंत चुरशीची होत असते. बुधवारी सायंकाळपासूनच विविध विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते चंद्रपुरात दाखल झाले आहे. त्यामुळे निकाल परिसर केंद्रात कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी राहणार असल्याने पोलीस प्रशासनाने ५०० पोलिसांचा ताफा सज्ज केला आहे. यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, चार उपविभागीय पोलीस अधीकारी, दहा पोलीस निरिक्षक, ८० पोलीस उपनिरिक्षक व सहाय्यक पोलीस निरिक्षक, १०० महिला पोलीस कर्मचारी, ३०० पुरुष पोलीस कर्मचारी बुधवारपासूनच तैनात करण्यात आले आहे.मतमोजणी केंद्रावरील सर्व घडामोडींवर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व अप्पर पोलीस अधीक्षक हे स्वत: लक्ष ठेऊन राहणार आहेत. यासोबत सीआरपीएफचे जवान निवडणुकीच्या दिवशीपासून एमआयडीसी वखार महामंडळाच्या परिसरात तैनात आहेत.चौकाचौकात पोलीस बंदोबस्तनिकालादरम्यान राजकीय पक्षाच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा होत असतात. तसेच रस्त्यावरसुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे चौकाचौकात पोलिसांनी बॅरिकेट्स लावले असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Policeपोलिस