शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

वेतनाअभावी कामगारांवर उपासमारीची वेळ

By admin | Updated: February 27, 2015 00:56 IST

कोरपना तालुक्यातील मुर्ली अ‍ॅग्रो सिमेंट कंपनीत काम करणाऱ्या कामगारांचे पगार मागील दोन महिन्यांपासून झालेले नाही.

नांदाफाटा: कोरपना तालुक्यातील मुर्ली अ‍ॅग्रो सिमेंट कंपनीत काम करणाऱ्या कामगारांचे पगार मागील दोन महिन्यांपासून झालेले नाही. यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून कंपनी प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. गेल्या पाच ते सहा वर्षापासून नारंडा गावानजीक ही कंपनी सुरू आहे. यामध्ये जिल्ह्यासह इतर राज्यातील ३०० ते ४०० कामगार सद्यस्थितीत काम करीत आहेत. यापूर्वीही कामगारांच्या पगाराबाबत अनेकदा प्रश्न निर्माण झाले. त्यानंतर कामगारांनी आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर पगार पूर्ववत सुरु करण्यात आले. मात्र आता पुन्हा कंपनी प्रशासनाने कामगारांच्या वेतनाबाबत दिरंगाई दाखविली असून कामगारांचे मोठे हाल होताना दिसत आहे. कंपनीसाठी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमीन यापूर्वी दिल्या. मात्र त्याचा कमी मोबदला व नियमित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना वेतनही वेळेवर दिल्या जात नाही. याचबरोबर कामगारांच्या मुलभूत सुविधाबाबत कंपनी प्रशासन उदासिन धोरण बाळगून आहे. आरोग्य स्वच्छपाणी, धूळ नियंत्रण संयंत्र, वृक्षारोपण, सुरक्षतेबाबत अनेक प्रश्न कंपनी परिसरात निर्माण झालेले दिसत आहे. कंपनी स्थापनेनंतर दत्तक गावांमध्ये मुलभूत सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे कंपनी प्रशासनामार्फत सांगण्यात आले. परंतु तसेही झालेले नाही.कंपनीत काम करणारे अर्ध्याहून अधिक कामगार कंत्राटी पद्धतीने काम करीत आहे. यातच गडचांदूर, नारंडा, वनसडी, नांदाफाटा येथे किरायाने सदर कामगार वास्तव्यास आहेत. महिन्याला तीन ते चार हजार रुपयात काम करणारे कंत्राटी कामगारांचे कुटुंब कंपनी प्रशासनावर विसंबून आहे. अशातच गेल्या दोन महिन्यांपासून पगार न मिळल्याने जगायचे कसे, असा प्रश्न कामगारांपुढे आ वासून उभा आहे. पगार मिळत नसल्याने मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नही गंभीर होताना दिसत आहे. तालुक्यातील इतर सिमेंट कंपन्या कामगारांना बस सुविधा, क्वाटर्स, रुग्णालय, पिण्याचे पाणी, सुरक्षा साहित्य, वेतन आदी नियमित देत असताना मुर्ली अ‍ॅग्रो प्रशासन मात्र कामगारांवर अन्याय करीत असल्याचा आरोप कामगार करीत आहे. त्वरित वेतन न मिळाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे. याबाबत कंपनीचे प्रकल्प अधिकारी पराते यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कंपनीत सध्या उत्पादन बंद आहे. यामुळे कामगारांना महिनाभर काम मिळत नाही. त्यामुळे वेतन देण्यास विलंब होत आहे. (वार्ताहर)